2 इतिहास Chapter 6 MARIRV Bible Verse Images

2 इतिहास 6 Bible Verse Pictures. Choose from a large collection of inspirational, motivational and encouraging Bible verses with pictures of nature. Download and share 2 इतिहास 6 inspirational Bible verse images. Bible verse pictures were created based on verses from the Indian Revised Version (IRV) - Marathi. IRV-Marathi Bible verse images were generated with permission from Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS).

Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.
Please remember to give attribution to Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. when using IRV-Marathi Bible Verse images. You can use CC-licensed materials as long as you follow the license conditions. One condition of all CC licenses is attribution.

Creative Commons License

Terms of Use: This work is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. It is attributed to Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS), and the Unified Scripture XML (USX) format version can be found on the Digital Bible Library website. All IRV-Marathi Bible verse images were generated with permission from Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS).

In addition, we would like to give very special thanks to eBible.org for making the Marathi Indian Revised Version Bible available in MySQL format.


2 इतिहास 6:1 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मग शलमोन म्हणाला, “मी निबीड अंधकारात वास करीन असे परमेश्वर म्हणाला आहे.

2 इतिहास 6:2 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
परमेश्वरा, तुझ्या निवासासाठी मी हे विशाल घर बांधले आहे, तेथे तू चिरकाल राहावेस.”

2 इतिहास 6:3 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मग शलमोनाने मागे वळून सर्व इस्राएल समुदायांना आशीर्वाद दिला. आणि ते सर्व उभे राहीले.

2 इतिहास 6:4 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
शलमोन पुढे म्हणाला, “इस्राएलाच्या परमेश्वर देवाचे स्तवन करा. माझे पिता दावीद यांच्याशी तो जे बोलला ते त्याने खरे करून दाखवले आहे. परमेश्वर देवाने असे वचन दिले होते.”

2 इतिहास 6:5 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मी माझ्या लोकांस मिसरातून बाहेर आणल्यानंतर इस्राएल वंशातील कोणतेही नगर मी माझ्या नावाचे घर तिथे बांधले जावे म्हणून निवडले नाही. तसेच, माझ्या इस्राएल लोकांचे आधिपत्य करण्यासाठी कोणाएकाची निवडही केली नाही.

2 इतिहास 6:6 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
पण आता यरूशलेम हे स्थान माझे नाव तेथे रहावे यासाठी मी निवडले आहे आणि दावीदाला इस्राएल लोकांवर नेमले आहे.

2 इतिहास 6:7 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
“इस्राएलाचा देव परमेश्वर याच्या प्रीत्यर्थ माझे पिता दावीद यांना मंदिर बांधायचे होते.

2 इतिहास 6:8 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
पण परमेश्वर त्यांना म्हणाला, ‘दावीद माझ्या नावाने मदिर बांधायचा विचार तुझ्या मनात आला हे चांगले झाले.

2 इतिहास 6:9 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
पण ते तू बांधू शकत नाहीस पण तुझा पुत्र जो तुझ्यापासून जन्मला तो हे काम करील.’

2 इतिहास 6:10 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
आता परमेश्वराने कबूल केले तसेच झाले आहे व माझे पिता दावीद यांच्या जागी मी इस्राएल लोकांचा राजा झालो आहे. ‘मी इस्राएलचा राजा आहे असे होईल’ हे वचन परमेश्वराने दिले होते, आणि मी इस्राएलाचा देव परमेश्वर याच्या नावाने मंदिर बांधले आहे.

2 इतिहास 6:11 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मी कराराचा कोश मंदिरात ठेवला आहे. इस्राएलच्या लोकांशी परमेश्वराने केलेला करार या कोशात आहे.”

2 इतिहास 6:12 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
शलमोन, परमेश्वराच्या वेदीसमोर उभा राहिला. तेथे जमलेल्या सर्व इस्राएल लोकांपुढे तो उभा होता. त्याने आपले बाहू पसरले.

2 इतिहास 6:13 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
बाहेरच्या दालनात प्रत्येकी पाच हात लांब, पाच हात रुंद आणि तीन हात उंच असलेला एक पितळी चौरंग शलमोनाने तयार केला व मंडपाच्या मध्यभागी ठेवला. त्यावर चढून तो समस्त इस्राएल लोकांसमोर गुडघे टेकून बसला आणि त्याने आकाशाकडे हात पसरले.

2 इतिहास 6:14 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
शलमोन म्हणाला, “हे इस्राएलाच्या परमेश्वर देवा, स्वर्गात किंवा पृथ्वीवर तुझ्यासारखा दुसरा कोणीही देव नाही. तुझे जिवाभावाने अनुसरण करणाऱ्या आणि योग्य आचरण करणाऱ्या तुझ्या सेवकांना तुझे प्रेम आणि तुझी कृपा यांचे दिलेले वचन पाळणारा तू परमेश्वर आहेस.”

2 इतिहास 6:15 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
दावीद याला दिलेले वचन तू पाळलेस. दावीद माझे पिता होते तू आपल्या मुखानेच त्यांना वचन दिलेस आणि आज आपल्या हाताने ते प्रत्यक्षात आणले आहेस.

2 इतिहास 6:16 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तसेच आता, हे इस्राएलच्या परमेश्वर देवा, दावीद या सेवकाला दिलेले हे वचनही खरे कर. तू असे म्हणाला होतास: माझ्यासमक्ष इस्राएलच्या राजासनावर न चुकता तुझ्या वंशातीलच कोणीतरी येत जाईल. मात्र तुझ्या मुलांनी माझ्या नियमशास्त्राप्रमाणे काटेकोर वर्तन केले पाहिजे. तुझ्याप्रमाणेच त्यांनीही माझा करार पाळला पाहिजे.

2 इतिहास 6:17 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तेव्हा आता, हे इस्राएलाच्या परमेश्वर देवा, तुझे हे शब्द खरे होऊ देत. आपला सेवक दावीद याला तू तसा शब्द दिला आहेस.

2 इतिहास 6:18 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
परमेश्वर पृथ्वीवर लोकांमध्ये वस्ती करु शकत नाही ही गोष्ट, हे देवा, आम्हास माहीत आहे. आकाश आणि त्या पुढचे अवकाशही तुला सामावून घ्यायला असमर्थ आहेत. या मी बांधलेल्या मंदिरातही तू मावू शकत नाहीस हे आम्ही जाणतो

2 इतिहास 6:19 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
पण माझी एवढी प्रार्थना ऐक. मी करुणा भाकतो तिजकडे लक्ष दे. परमेश्वर देवा, माझी हाक ऐक. मी तुझा एक दास आहे.

2 इतिहास 6:20 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
या मंदिराकडे अहोरात्र तुझी दृष्टी असो असे मी तुला कळकळीने विनवतो. तुझे नाव इथे राहील असे तू म्हणाला होतास, मी या मंदिराकडे तोंड करून प्रार्थना करीन तेव्हा ती तू ऐक.

2 इतिहास 6:21 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तुझ्या इस्राएल लोकांनी तसेच मी केलेल्या प्रार्थना तू ऐक. या प्रार्थनास्थळाकडे तोंड करून आम्ही प्रार्थना करु तेव्हा तिच्याकडे तू लक्ष दे. तुझ्या आकाशातील स्थानावरुन इथे तुझे लक्ष असू दे. आमच्या प्रार्थना ऐक आणि आम्हास क्षमा कर.

2 इतिहास 6:22 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
एखाद्याने आपल्या शेजाऱ्याचा काही अपराध केल्याचा आरोप त्याच्यावर आला आणि तो तुझे नाव घेऊन आपण निर्दोष आहोत असे सांगू लागला तर तो वेदीसमोर तसे शपथ घेऊन सांगत असतांना,

2 इतिहास 6:23 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तू स्वर्गातून ऐक तुझ्या सेवकाचा योग्य न्यायनिवाडा कर ज्याच्या हातून अपराध घडला असेल त्यास शासन कर त्याच्यामुळे इतरांना जसा त्रास झाला तसाच याला होऊ दे आणि ज्याचे वागणे उचित होते तो निर्दोष असल्याचे सिध्द कर. त्याचे प्रतिफळ त्यास दे.

2 इतिहास 6:24 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
इस्राएल लोकांनी तुझ्याविरुध्द पाप केल्यामुळे जर शत्रूंनी तुझ्या इस्राएल लोकांचा पराभव केला आणि अशावेळी इस्राएल लोक तुझ्याकडे येऊन तुझ्या नावाने प्रार्थना करु लागले, या मंदिरात येऊन विनवणी करु लागले तर.

2 इतिहास 6:25 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तू स्वर्गातून ते ऐकून इस्राएल लोकांच्या पापांची क्षमा कर. तू त्यांना आणि त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या भूमीवर त्यांना पुन्हा परत आण.

2 इतिहास 6:26 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
जर इस्राएल लोकांनी पाप केल्यामुळे आकाश बंद होऊन पर्जन्यवृष्टी झालीच नाही त्यावेळी पश्चातापाने इस्राएल लोकांनी मंदिराच्या दिशेने पाहत प्रार्थना केली, आणि तू केलेल्या शिक्षेमुळे अपराध करणे थांबवले,

2 इतिहास 6:27 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तर स्वर्गातून त्यांचे ऐक आणि त्यांच्या पापांची क्षमा कर. इस्राएल लोक तुझे दास आहेत. त्यांना जगण्याचा सन्मार्ग दाखव. तुझ्या भूमीवर पाऊस पाड. कारण हा देश तू आपल्या लोकांस वतन करून दिला आहे.

2 इतिहास 6:28 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
कदाचित् एखादयावेळी दुष्काळ, भयानक साथीचा रोग, किंवा पिकांवर रोग अथवा टोळ, नाकतोडे यांची धाड अशी काही आपत्ती किंवा लोकांच्या राहत्या नगरांवर शत्रूंचा हल्ला झाल्यास, रोगराई आल्यास,

2 इतिहास 6:29 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तुझे इस्राएल लोक तुझी करुणा भाकतील आणि प्रार्थना करतील. जो कोणी आपले क्लेश किंवा दु:ख ओळखून, या मंदिराच्या दिशेने बाहू उभारुन प्रार्थना करु लागेल.

2 इतिहास 6:30 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तेव्हा तू ते स्वर्गातून ऐक. जेथे तू राहतोस. तू ऐकून त्यांना क्षमा कर. प्रत्येका मनुष्याचा मनोदय तुला माहीत असल्यामुळे ज्याला जे योग्य असेल त्यास ते दे. मानवाचे मन फक्त तूच ओळखतोस.

2 इतिहास 6:31 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
असे झाले म्हणजे तू आमच्या पूर्वजांना दिलेल्या या भूभागावर त्यांची वस्ती असेपर्यंत लोक तुझे भय बाळगतील आणि तुझे ऐकतील.

2 इतिहास 6:32 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
जर तुझ्या इस्राएल प्रजेपेक्षा वेगळा असा कोणी उपराही कदाचित् दूर देशाहून इथे आलेला असेल. तुझ्या नावाची महती, आणि तुझे सामर्थ्यशाली बाहू यांच्यामुळे तो आलेला असेल. त्याने येऊन या मंदिराकडे पाहत प्रार्थना केली तर,

2 इतिहास 6:33 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तू ती स्वर्गातून ऐक. त्याची मागणी पुरव. म्हणजे इस्राएल लोकांप्रमाणेच पृथ्वीवरील इतर लोकांसही तुझ्या नावाचा महिमा कळेल आणि त्यांना तुझ्याविषयी आदर वाटेल. व मी बांधलेले हे मंदिर तुझ्या नावाचे आहे ते पृथ्वीवरील सर्व लोकांस कळेल.

2 इतिहास 6:34 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
शत्रूंशी लढावयास जर तू आपल्या लोकांस दुसऱ्या ठिकाणी पाठवशील आणि तिथून ते तू निवडलेल्या या नगराच्या आणि मी बांधलेल्या मंदिराच्या दिशेने पाहत प्रार्थना करु लागतील.

2 इतिहास 6:35 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तर तू स्वर्गातून त्यांची प्रार्थना ऐक आणि त्यांच्या विनंती प्रमाणे त्यांना मदत कर.

2 इतिहास 6:36 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
पाप कोणाच्या हातून होत नाही? तेव्हा लोक तुझ्याविरुध्द पाप करतील जेव्हा तुझा त्यांच्यावर कोप होईल. तू शत्रूंकरवी त्यांचा पाडाव करशील, बंदी म्हणून त्यांना बळजबरीने इथून दूरच्या किंवा एखाद्या जवळच्या ठिकाणी नेले जाईल.

2 इतिहास 6:37 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
पण तिथे त्यांचे हृदयपरिवर्तन होऊन, परभूमीत कैदी होऊन पडलेले ते विनवणी करून म्हणतील, आम्ही चुकलो, आमच्या हातून पाप घडले आहे. आम्ही दुराचरण केले आहे.

2 इतिहास 6:38 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
असतील तिथून ते अंतःकरणातून तुला शरण येतील. या देशाच्या तू त्याच्या पूर्वजांना दिलेल्या देशाच्या दिशेने आणि तू निवडलेल्या नगराच्या दिशेने पाहत ते प्रार्थना करतील. तुझ्या नावाकरिता मी बांधलेल्या या मंदिराच्या दिशेने पाहत ते प्रार्थना करतील.

2 इतिहास 6:39 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तेव्हा तू तुझ्या स्वर्गातील निवासस्थानातून ऐक; त्यांच्या प्रार्थना व विनंतीकडे कान दे, त्यांना मदत कर. ज्यांनी तुझ्याविरुध्द पाप केले आहे अशा तुझ्या लोकांस क्षमा कर.

2 इतिहास 6:40 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
आता, हे परमेश्वरा, माझी तुला विनवणी आहे की तू तुझे कान आणि डोळे उघड. आम्ही इथे बसून जी प्रार्थना करणार आहोत ती लक्षपूर्वक ऐक.

2 इतिहास 6:41 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
आता, हे परमेश्वर देवा, तुझे सामर्थ्य मिरवणाऱ्या या कराराच्या कोशाजवळ, आपल्या विश्रामस्थानी तू ये. तुझे याजक उध्दाराने भूषित होवोत. तुझ्या चांगूलपणात तूझे भक्त हर्ष पावोत.

2 इतिहास 6:42 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
“हे परमेश्वर देवा, तुझ्या अभिषिक्त राजाचा स्विकार कर. तुझा एकनिष्ठ सेवक दावीद याचे स्मरण असू दे.”

Available Bible Translations

American Standard Version (ASV)
2 Chronicles 6 (ASV) »
King James Version (KJV)
2 Chronicles 6 (KJV) »
GOD’S WORD® (GW)
2 Chronicles 6 (GW) »
Berean Bible (BSB)
2 Chronicles 6 (BSB) »
World English Bible (WEB)
2 Chronicles 6 (WEB) »
French Bible (LSG)
2 Chroniques 6 (LSG) »
German Bible (LUTH1912)
2 Chronik 6 (LUTH1912) »
Arabic Bible (AVD)
٢ أخبار 6 (AVD) »
Portuguese Bible (BSL)
2 Crônicas 6 (BSL) »
Vietnamese Bible (VIE)
2 Sử Ký 6 (VIE) »
Spanish Bible (RVA)
2 Crónicas 6 (RVA) »
Italian Bible (RIV)
2 Cronache 6 (RIV) »
Chinese Simplified (CUVS)
历 代 志 下 6 (CUVS) »
Chinese Traditional (CUVT)
歷 代 志 下 6 (CUVT) »
Albanian Bible (ALB)
2 Kronikave 6 (ALB) »
Swedish Bible (SV1917)
2 Krönikeboken 6 (SV1917) »
Ukrainian Bible (UKR)
2 хроніки 6 (UKR) »
Hungarian Bible (KAR)
2 Krónika 6 (KAR) »
Bulgarian Bible (BULG)
2 Летописи 6 (BULG) »
Japanese Bible (JPN)
歴代志下 6 (JPN) »
Norwegian Bible (NORSK)
2 Krønikebok 6 (NORSK) »

2 इतिहास (MARIRV) Chapter Selection

MARIRV Book Selection List