लेवीय Chapter 15 MARIRV Bible Verse Images

लेवीय 15 Bible Verse Pictures. Choose from a large collection of inspirational, motivational and encouraging Bible verses with pictures of nature. Download and share लेवीय 15 inspirational Bible verse images. Bible verse pictures were created based on verses from the Indian Revised Version (IRV) - Marathi. IRV-Marathi Bible verse images were generated with permission from Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS).

Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.
Please remember to give attribution to Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. when using IRV-Marathi Bible Verse images. You can use CC-licensed materials as long as you follow the license conditions. One condition of all CC licenses is attribution.

Creative Commons License

Terms of Use: This work is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. It is attributed to Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS), and the Unified Scripture XML (USX) format version can be found on the Digital Bible Library website. All IRV-Marathi Bible verse images were generated with permission from Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS).

In addition, we would like to give very special thanks to eBible.org for making the Marathi Indian Revised Version Bible available in MySQL format.


लेवीय 15:1 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
परमेश्वर मोशे व अहरोन ह्यांना आणखी म्हणाला,

लेवीय 15:2 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
इस्राएल लोकांस सांगा की एखाद्या पुरुषाच्या शरीरातून स्त्राव होत असल्यास तो पुरुष अशुद्ध होय.

लेवीय 15:3 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
त्याचा स्त्राव वाहत असो किंवा बंद पडो, ती त्याची अशुद्धताच होय.

लेवीय 15:4 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
स्त्राव होणारा मनुष्य ज्या बिछान्यावर झोपेल तो अशुद्ध होय आणि ज्या वस्तूवर तो बसेल तीही अशुद्ध होय.

लेवीय 15:5 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
जो कोणी त्याच्या बिछान्याला स्पर्श करेल त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.

लेवीय 15:6 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
स्त्राव होणारा मनुष्य बसलेल्या वस्तूवर कोणी बसेल तर त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.

लेवीय 15:7 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
स्त्राव होणाऱ्या मनुष्याच्या अंगाला जर कोणी स्पर्श केला तर त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.

लेवीय 15:8 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
स्त्राव होणारा मनुष्य जर एखाद्या शुद्ध मनुष्यावर थुंकला तर त्या शुद्ध मनुष्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.

लेवीय 15:9 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
स्त्राव होणारा मनुष्य ज्या खोगीराचा उपयोग करील ते खोगीर अशुद्ध होय.

लेवीय 15:10 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
त्याच्या अंगाखालच्या कोणत्याही वस्तुला कोणी स्पर्श केला तर त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे, व त्या वस्तू जो उचलील त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.

लेवीय 15:11 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
स्त्राव होणारा मनुष्य पाण्याने हात न धुता कोणाला स्पर्श केला तर त्या दुसऱ्या मनुष्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.

लेवीय 15:12 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
परंतु स्त्राव होणारा मनुष्य एखाद्या मातीच्या पात्राला स्पर्श केला तर ते पात्र फोडून टाकावे, मात्र प्रत्येक लाकडी पात्र पाण्याने धुवावे.

लेवीय 15:13 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
स्त्राव होणारा मनुष्य आपल्या स्त्रावापासून बरा झाल्यावर त्याने आपल्या शुद्धीकरणासाठी सात दिवस थांबावे आणि मग आपले कपडे धुऊन वाहत्या पाण्यात आपले अंग धुवावे म्हणजे तो शुद्ध ठरेल.

लेवीय 15:14 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
आठव्या दिवशी त्याने दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले घेऊन दर्शनमंडपाच्या दारापाशी परमेश्वरासमोर जावे व याजकाकडे ती द्यावी.

लेवीय 15:15 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मग याजकाने त्यातील एकाचे पापार्पण व दुसऱ्याचे होमार्पण करावे आणि त्या मनुष्याच्या स्त्रावाबद्दल परमेश्वरासमोर त्याच्यासाठी प्रायश्चित करावे.

लेवीय 15:16 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
एखाद्या पुरुषाचा वीर्यपात झाला तर त्याने आपले सर्वांग पाण्याने धुवून संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.

लेवीय 15:17 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
ज्या कपड्याला किंवा चामड्याला वीर्य लागले असेल तेही पाण्याने धुऊन संध्याकाळपर्यंत अशुद्ध समजावे.

लेवीय 15:18 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
स्त्री बरोबर निजला असताना पुरुषाचा वीर्यपात झाला तर त्या दोघांनी पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.

लेवीय 15:19 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
एखादी स्त्री ऋतुमती झाली तर तिने सात दिवस दूर बसावे; जो कोणी तिला स्पर्श करेल त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे;

लेवीय 15:20 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
ती दूर असेपर्यंत ज्यावर ती झोपेल वा बसेल तेही अशुद्ध होय.

लेवीय 15:21 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
जो कोणी तिच्या अंथरुणाला स्पर्श करेल, त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.

लेवीय 15:22 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
ती ज्यावर बसली असेल त्यास जो कोणी स्पर्श करेल त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.

लेवीय 15:23 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तिच्या अंथरुणाला किंवा ज्यावर ती बसली असेल त्यास शिवणाऱ्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.

लेवीय 15:24 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
अशा स्त्रीबरोबर लैगिक संबंध केलेला पुरुषाने सात दिवस अशुद्ध रहावे व ज्या अंथरुणावर तो झोपेल तेही अशुद्ध समजावे.

लेवीय 15:25 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
एखाद्या स्त्रीचा ऋतुकाल नसताना जर अनेक दिवस तिला रक्तस्राव होत असेल किंवा मुदतीच्या बाहेर ती ऋतुमती राहिली तर तिचे स्त्रावाचे सर्व दिवस तिच्या ऋतुकालाच्या दिवसाप्रमाणे समजावे. ती अशुद्ध होय.

लेवीय 15:26 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तिला स्त्राव होत असतानाच्या सर्व काळात ती ज्या अंथरुणावर झोपेल, ते अंथरुण तिच्या मासिक पाळीच्या वेळच्या अंथरुणाप्रमाणे समजावे. ती ज्यावर बसेल ती प्रत्येक गोष्ट तिच्या मासिक पाळीच्या काळात अशुद्ध असते. तशी अशुद्ध समजावी.

लेवीय 15:27 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
जर कोणी त्या वस्तूंना स्पर्श करेल तर तो अशुद्ध होईल. त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.

लेवीय 15:28 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
त्या स्त्रीचा स्त्राव बंद झाल्यावर तिने सात दिवस थांबावे; त्यानंतर ती शुद्ध होईल.

लेवीय 15:29 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मग आठव्या दिवशी तिने दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले घेऊन दर्शनमंडपाच्या दारापाशी याजकाकडे जावे.

लेवीय 15:30 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मग याजकाने एकाचे पापार्पण व दुसऱ्याचे होमार्पण करावे. अशाप्रकारे याजकाने तिच्या अशुद्धतेकरिता परमेश्वरासमोर प्रायश्चित करावे.

लेवीय 15:31 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
ह्याप्रकारे तुम्ही इस्राएल लोकांस अशुद्धतेबद्दल बजावून ठेवावे; नाहीतर ते माझा पवित्र निवासमंडप भ्रष्ट करतील आणि मग त्याच्याबद्दल त्यांना मरावेच लागेल!

लेवीय 15:32 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
स्त्राव होऊन किंवा वीर्यपात होऊन जो पुरुष अशुद्ध होतो;

लेवीय 15:33 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
आणि जी स्त्री ऋतुमती होते आणि जो कोणी पुरुष, ऋतुमती असल्यामुळे अशुद्ध झालेल्या स्त्रीशी लैंगिक संबंध करून अशुद्ध होतो, त्यांच्या संबंधीचे हे नियम आहेत.

Available Bible Translations

American Standard Version
Leviticus 15 (ASV) »
King James Version
Leviticus 15 (KJV) »
GOD’S WORD® (GW)
Leviticus 15 (GW) »
World English Bible
Leviticus 15 (WEB) »
Louis Segond 1910
Lévitique 15 (LSG) »
इंडियन रिवाइज्ड वर्जन - हिंदी
लैव्यव्यवस्था 15 (HINIRV) »
ਭਾਰਤੀ ਸੋਧਿਆ ਹੋਇਆ ਸੰਸਕਰਣ - ਪੰਜਾਬੀ
ਅਹਬਾਰ 15 (PANIRV) »
ভারতীয় সংশোধিত সংস্করণ - বাংলা
লেবীয়া 15 (BENIRV) »
இந்தியன் ரீவைஸ்டு வேர்ஷன் - தமிழ்
லேவியராகமம் 15 (TAMIRV) »
ఇండియన్ రేవిజ్డ్ వెర్షన్ - తెలుగు
లేవీకాండం 15 (TELIRV) »
ઇન્ડિયન રિવાયઝ્ડ વર્ઝન - ગુજરાતી
લેવીય 15 (GUJIRV) »
ಭಾರತೀಯ ಪರಿಷ್ಕೃತ ಆವೃತ್ತಿ - ಕನ್ನಡ
ಯಾಜಕಕಾಂಡ 15 (KANIRV) »
الكتاب المقدس باللغة العربية، فان دايك
اَللَّاوِيِّينَ 15 (AVD) »
תנ ך עברי מודרני
ויקרא 15 (HEB) »
Bíblia Sagrada Português
Levítico 15 (BSL) »
Kinh Thánh: Tiếng Việt
Lê-vi 15 (VIE) »
Reina Valera Antigua
Levítico 15 (RVA) »
La Sacra Bibbia
Levitico 15 (RIV) »
圣 经 简体中文和合本
利 未 记 15 (CUVS) »
聖 經 繁體中文和合本
利 未 記 15 (CUVT) »
Bibla e Shenjtë
Levitiku 15 (ALB) »
Svenska Bibeln 1917
3 Mosebok 15 (SV1917) »
Библия на русском
Левит 15 (RUSV) »
Українська Біблія
Левит 15 (UKR) »
Szent Biblia - Magyar
3 Mózes 15 (KAR) »
Българска Библия
Левит 15 (BULG) »
聖書 日本語
レビ記 15 (JPN) »
Kitaabka Quduuska Ah
Laawiyiintii 15 (SOM) »
De Heilige Schrift
Leviticus 15 (NLD) »

लेवीय (MARIRV) Chapter Selection

MARIRV Book Selection List