लेवीय Chapter 14 MARIRV Bible Verse Images

लेवीय 14 Bible Verse Pictures. Choose from a large collection of inspirational, motivational and encouraging Bible verses with pictures of nature. Download and share लेवीय 14 inspirational Bible verse images. Bible verse pictures were created based on verses from the Indian Revised Version (IRV) - Marathi. IRV-Marathi Bible verse images were generated with permission from Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS).

Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.
Please remember to give attribution to Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. when using IRV-Marathi Bible Verse images. You can use CC-licensed materials as long as you follow the license conditions. One condition of all CC licenses is attribution.

Creative Commons License

Terms of Use: This work is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. It is attributed to Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS), and the Unified Scripture XML (USX) format version can be found on the Digital Bible Library website. All IRV-Marathi Bible verse images were generated with permission from Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS).

In addition, we would like to give very special thanks to eBible.org for making the Marathi Indian Revised Version Bible available in MySQL format.


लेवीय 14:1 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
परमेश्वर मोशेला म्हणाला,

लेवीय 14:2 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
महारोग बरा झालेल्या लोकांस शुद्ध करून घेण्याविषयीचे नियम असे: याजकाने महारोग्याला तपासावे.

लेवीय 14:3 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
याजकाने छावणीच्या बाहेर जाऊन त्या महारोग्याला तपासावे व त्याचा महारोग बरा झाला आहे किंवा नाही ते पाहावे.

लेवीय 14:4 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तो बरा झाला असल्यास याजकाने त्यास शुद्ध होण्यासाठी दोन जिवंत शुद्ध पक्षी, गंधसरूचे लाकूड, किरमिजी रंगाचे कापड व एजोब झाडाची फांदी घेऊन येण्यास सांगावे.

लेवीय 14:5 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मग वाहत्या पाण्यावर मातीच्या पात्रात त्यातला एक पक्षी मारण्याची याजकाने आज्ञा द्यावी.

लेवीय 14:6 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
याजकाने जिवंत पक्षी, गंधसरुचे लाकूड, किरमिजी रंगाचे कापड व एजोब ही सामग्री घेऊन जिवंत पक्षासह वाहत्या पाण्यावर मारलेल्या पक्ष्याच्या रक्तात बुडवावी;

लेवीय 14:7 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
आणि ते रक्त महारोगापासून शुद्ध ठरवावयाच्या मनुष्यावर सात वेळा शिंपडावे; मग तो शुद्ध झाला आहे असे सांगावे व त्यानंतर याजकाने माळरानात जाऊन त्या जिवंत पक्ष्यास सोडून द्यावे.

लेवीय 14:8 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मग शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याने आपले कपडे धुवावे, आपले मुंडन करून घ्यावे आणि पाण्याने स्नान करावे म्हणजे तो शुद्ध ठरेल; त्यानंतर त्याने छावणीत यावे; तरी त्याने सात दिवस आपल्या तंबूबाहेर रहावे;

लेवीय 14:9 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
सातव्या दिवशी त्याने आपले डोके, दाढी, भुवया व अंगावरील एकंदर सर्व केस मुंडवावे; आपले कपडे धुवावे व पाण्याने स्नान करावे, म्हणजे तो शुद्ध होईल.

लेवीय 14:10 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
आठव्या दिवशी त्या मनुष्याने दोन निर्दोष कोकरे, एक वर्षाची निर्दोष मेंढी, अन्नार्पणासाठी तेलात मळलेला तीन दशांश एफा मैदा, व एक लोगभर तेल ही सामग्री याजकाकडे आणावी;

लेवीय 14:11 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
आणि शुद्ध ठरविणाऱ्या याजकाने शुद्ध ठरवणाऱ्या मनुष्यास, त्या अर्पण करावयाच्या सामग्रीसह परमेश्वरासमोर दर्शनमंडपाच्या दारापाशी उभे करावे.

लेवीय 14:12 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मग याजकाने दोषार्पणासाठी एक कोकरु व एक लोगभर तेल अर्पावे; ते ओवाळणीचे अर्पण म्हणून परमेश्वरासमोर ओवाळावे;

लेवीय 14:13 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मग याजकाने पवित्रस्थानात जेथे पापबली व होमबली ह्यांचा वध करतात तेथे ते कोकरु वधावे कारण पापबली प्रमाणेच दोषार्पणावरही याजकाचा हक्क आहे; हे अर्पण परमपवित्र आहे.

लेवीय 14:14 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मग याजकाने दोषार्पणाचे काही रक्त घेऊन शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याच्या उजव्या कानाच्या पाळीला, उजव्या हाताच्या अंगठ्याला व उजव्या पायाच्या अंगठ्याला लावावे.

लेवीय 14:15 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
याजकाने लोगभर तेलातले थोडेस तेल आपल्या डाव्या तळहातावर ओतावे;

लेवीय 14:16 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मग याजकाने आपल्या उजव्या हाताचे बोट आपल्या डाव्या तळहातावरील तेलात बुडवून त्यातले काही परमेश्वरासमोर सात वेळा बोटाने शिंपडावे.

लेवीय 14:17 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
त्याच्या तळहातावर जे तेल उरेल त्यातले काही घेऊन याजकाने शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याच्या उजव्या कानाच्या पाळीवरील, उजव्या हाताच्या अंगठ्यावरील व उजव्या पायाच्या अंगठ्यावरील दोषार्पणाच्या रक्तावर लवावे.

लेवीय 14:18 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तळहातावर उरलेले तेल याजकाने शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याच्या डोक्याला लावावे आणि अशा प्रकारे त्या मनुष्यासाठी याजकाने परमेश्वरासमोर प्रायश्चित करावे.

लेवीय 14:19 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मग याजकाने पापबली अर्पावा आणि अशुद्ध झालेल्या मनुष्याच्या शुद्धतेसाठी प्रायश्चित करावे; त्यानंतर त्याने होमबलीचा वध करावा;

लेवीय 14:20 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मग याजकाने होमबली व अन्नबली वेदीवर अर्पून त्या मनुष्यासाठी प्रायश्चित करावे म्हणजे तो शुद्ध ठरेल.

लेवीय 14:21 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
परंतु तो मनुष्य गरीब असून एवढे आणण्याची त्यास ऐपत नसेल तर त्याने आपल्या प्रायश्चितासाठी ओवाळणीचे एक कोकरु दोषार्पण म्हणून आणावे आणि अन्नार्पणासाठी तेलात मळलेला, एक दशांश एफा मैदा आणि एक लोगभर तेल आणावे;

लेवीय 14:22 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
आणि ऐपतीप्रमाणे दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले त्याने आणावी; त्यातील एक पापबली व एक होमबली व्हावा.

लेवीय 14:23 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
आठव्या दिवशी आपल्या शुद्धीकरणासाठी त्यानेही सामग्री घेऊन दर्शनमंडपाच्या दारापाशी याजकाकडे परमेश्वरासमोर जावे.

लेवीय 14:24 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मग याजकाने ते दोषार्पणाचे कोकरू व लोगभर तेल घेऊन ओवाळणीचे अर्पण म्हणून परमेश्वरासमोर ओवाळावे.

लेवीय 14:25 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
त्यानंतर याजकाने दोषार्पणाच्या कोकराचा वध करावा आणि त्याने त्या कोकऱ्याचे काही रक्त घेऊन शुद्ध ठरवावयाच्या व्यक्तीच्या उजव्या कानाच्या पाळीला, उजव्या हाताच्या अंगठ्याला व उजव्या पायाच्या अंगठ्यांला लावावे.

लेवीय 14:26 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
याजकाने त्या तेलातले काही आपल्या डाव्या तळहातावर ओतावे;

लेवीय 14:27 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मग याजकाने उजव्या हाताच्या बोटाने त्यातील काही तेल परमेश्वरासमोर सात वेळा शिंपडावे.

लेवीय 14:28 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मग याजकाने आपल्या तळहातावरील काही तेल घेऊन शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याच्या उजव्या कानाच्या पाळीवर, उजव्या हाताच्या व उजव्या पायाच्या अंगठ्यांवर, दोषार्पणाचे रक्त लावलेल्या जागेवर लावावे.

लेवीय 14:29 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
याजकाने तळहातावर उरलेले तेल शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याच्या डोक्याला परमेश्वरासमोर त्या मनुष्यासाठी प्रायश्चित म्हणून लावावे.

लेवीय 14:30 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मग त्याच्या ऐपतीप्रमाणे त्यास मिळालेले होले किंवा पारव्याची पिल्ले ह्यांच्यापैकी एकाचे त्याने अर्पण करावे.

लेवीय 14:31 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
त्यांच्यापैकी एकाचे पापार्पण करावे व दुसऱ्याचे होमार्पण करावे; पक्ष्यांची ही अर्पणे त्याने अन्नार्पणासहीत करावी; ह्याप्रकारे याजकाने शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याकरिता परमेश्वरासमोर प्रायश्चित करावे; मग तो मनुष्य शुद्ध होईल.

लेवीय 14:32 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
अंगावरील महारोगाचा चट्टा बरा झालेल्या मनुष्यास आपल्या शुद्धीकरणासाठी साहित्य मिळण्याची ऐपत नसलेल्या मनुष्याच्या शुद्धीकरणासंबंधी हे नियम आहेत.

लेवीय 14:33 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
परमेश्वर मोशे व अहरोन ह्याना असेही म्हणाला,

लेवीय 14:34 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
कनान देश मी तुम्हास वतन म्हणून देत आहे. तुमचे लोक त्यामध्ये जाऊन पोहोंचतील त्यावेळी तुमच्या वतनाच्या देशातील एखाद्या घराला मी महारोगाचा चट्टा पाडला,

लेवीय 14:35 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तर त्या घराच्या मालकाने याजकाला जाऊन सांगावे की, माझ्या घरात चट्ट्यासारखे काहीतरी दिसते.

लेवीय 14:36 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मग याजकाने लोकांस घर रिकामे करण्याची आज्ञा द्यावी; लोकांनीही घरातील सर्व वस्तू याजक, चट्टा तपासण्यासाठी घरात जाण्याच्या अगोदर बाहेर काढाव्या नाहीतर घरातील सर्व वस्तू अशुद्ध समजाव्या. मग याजकाने रिकाम्या घरात जाऊन ते तपासावे.

लेवीय 14:37 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तो चट्टा त्याने तपासावा, आणि घराच्या भिंतीवर हिरवट किंवा तांबूस रंगाची छिद्रे किंवा खळगे असतील व ती भिंतीच्या पृष्ठभागाच्या आत गेली असतील.

लेवीय 14:38 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तर मग याजकाने घराबाहेर दारापाशी यावे व ते घर सात दिवस बंद करून ठेवावे.

लेवीय 14:39 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मग सातव्या दिवशी याजकाने पुन्हा जाऊन ते घर तपासावे आणि तो चट्टा घराच्या भिंतीवर पसरला असल्यास,

लेवीय 14:40 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
चट्टा असलेले दगड काढून नगराबाहेर एखाद्या अशुद्ध जागी टाकून देण्याची याजकाने लोकांस आज्ञा द्यावी.

लेवीय 14:41 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मग याजकाने घर लोकांकडून आतून खरडवून घ्यावे आणि खरडवून काढलेला चुना नगराबाहेर अशुद्ध ठिकाणी लोकांनी टाकून द्यावा.

लेवीय 14:42 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
त्या मनुष्याने त्या दगडांच्या ऐवजी भिंतीत दुसरे दगड बसवावे आणि त्या घराला नव्या चुन्याचा गिलावा करावा.

लेवीय 14:43 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
जुने दगड काढून नवीन दगड बसविल्यावर व घर खरडवून नवीन गिलावा केल्यावर जर तो चट्टा घरात पुन्हा उद्भवला.

लेवीय 14:44 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तर याजकाने आत जाऊन तो तपासावा; घरात तो चट्टा पसरला असल्यास तो घरात चरत जाणारा महारोगाचा चट्टा होय; ते घर अशुद्ध आहे.

लेवीय 14:45 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मग त्या मनुष्याने ते घर खणून पाडावे; त्याचे दगड, लाकूड व सगळा चुना त्याने तेथून काढून नगराबाहेर एखाद्या अशुद्ध ठिकाणी फेकून द्यावा.

लेवीय 14:46 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
आणि घर बंद असताना त्यामध्ये कोणी शिरला तर त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे;

लेवीय 14:47 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
त्या घरात कोणी काही खाल्ले किंवा कोणी त्या घरात निजला तर त्याने आपले कपडे धुवावे.

लेवीय 14:48 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
घराला नवीन दगड बसविल्यावर व नवीन गिलावा केल्यावर याजकाने आत जाऊन ते घर तपासावे आणि घरात चट्टा परत उद्भवला नसेल तर त्या घरातला चट्टा गेल्यामुळे त्याने ते शुद्ध ठरवावे.

लेवीय 14:49 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
त्या घराच्या शुद्धीकरणासाठी दोन पक्षी, गंधसरुचे लाकूड, किरमिजी रंगाचे कापड व एजोब ही त्याने आणावी;

लेवीय 14:50 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
त्याने एक पक्षी वाहत्या पाण्यावर मातीच्या पात्रात मारावा;

लेवीय 14:51 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मग त्याने गंधसरुचे लाकूड, एजोब, किरमिजी रंगाचे कापड व जिवंत पक्षी घेऊन त्या मारलेल्या पक्ष्याच्या रक्तात व वाहत्या पाण्यात बुडवून त्या घरावर सात वेळा शिंपडावे.

लेवीय 14:52 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
त्या पक्ष्याचे रक्त, वाहते पाणी, तो जिवंत पक्षी, गंधसरूचे लाकूड, एजोब, आणि किरमिजी रंगाचे कापड ह्याप्रकारे याजकाने ते घर शुद्ध करावे.

लेवीय 14:53 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मग त्याने तो जिवंत पक्षी नगराबाहेर जाऊन माळरानात सोडून द्यावा; ह्याप्रकारे त्याने घरासाठी प्रायश्चित केले म्हणजे ते शुद्ध होईल.

लेवीय 14:54 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
सर्व प्रकारचे महारोगाचे चट्टे, चाई,

लेवीय 14:55 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
कपड्यावरील किंवा घराचा महारोग,

लेवीय 14:56 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
सूज, खवंद, तकतकीत डाग या सर्वासंबधीचे हे नियम आहेत;

लेवीय 14:57 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
हे केव्हा शुद्ध व केव्हा अशुद्ध हे ठरविण्याविषयी शिकवतात; हे महारोगासंबंधीचे नियम आहेत.

Available Bible Translations

American Standard Version (ASV)
Leviticus 14 (ASV) »
King James Version (KJV)
Leviticus 14 (KJV) »
GOD’S WORD® (GW)
Leviticus 14 (GW) »
Berean Bible (BSB)
Leviticus 14 (BSB) »
World English Bible (WEB)
Leviticus 14 (WEB) »
French Bible (LSG)
Lévitique 14 (LSG) »
German Bible (LUTH1912)
Levitikus 14 (LUTH1912) »
Punjabi Bible (PANIRV)
ਅਹਬਾਰ 14 (PANIRV) »
Gujarati Bible (GUJIRV)
લેવીય 14 (GUJIRV) »
Hebrew Bible (HEB)
ויקרא 14 (HEB) »
Portuguese Bible (BSL)
Levítico 14 (BSL) »
Vietnamese Bible (VIE)
Lê-vi 14 (VIE) »
Spanish Bible (RVA)
Levítico 14 (RVA) »
Italian Bible (RIV)
Levitico 14 (RIV) »
Chinese Simplified (CUVS)
利 未 记 14 (CUVS) »
Chinese Traditional (CUVT)
利 未 記 14 (CUVT) »
Albanian Bible (ALB)
Levitiku 14 (ALB) »
Swedish Bible (SV1917)
3 Mosebok 14 (SV1917) »
Russian Bible (RUSV)
Левит 14 (RUSV) »
Ukrainian Bible (UKR)
Левит 14 (UKR) »
Hungarian Bible (KAR)
3 Mózes 14 (KAR) »
Bulgarian Bible (BULG)
Левит 14 (BULG) »
Japanese Bible (JPN)
レビ記 14 (JPN) »
Norwegian Bible (NORSK)
3 Mosebok 14 (NORSK) »

लेवीय (MARIRV) Chapter Selection

MARIRV Book Selection List