लूक Chapter 19 MARIRV Bible Verse Images

लूक 19 Bible Verse Pictures. Choose from a large collection of inspirational, motivational and encouraging Bible verses with pictures of nature. Download and share लूक 19 inspirational Bible verse images. Bible verse pictures were created based on verses from the Indian Revised Version (IRV) - Marathi. IRV-Marathi Bible verse images were generated with permission from Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS).

Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.
Please remember to give attribution to Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. when using IRV-Marathi Bible Verse images. You can use CC-licensed materials as long as you follow the license conditions. One condition of all CC licenses is attribution.

Creative Commons License

Terms of Use: This work is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. It is attributed to Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS), and the Unified Scripture XML (USX) format version can be found on the Digital Bible Library website. All IRV-Marathi Bible verse images were generated with permission from Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS).

In addition, we would like to give very special thanks to eBible.org for making the Marathi Indian Revised Version Bible available in MySQL format.


लूक 19:1 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
येशूने यरीहोत प्रवेश केला आणि त्यामधून जात होता.

लूक 19:2 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तेव्हा पाहा, जक्कय नावाचा कोणीएक मनुष्य होता, तो मुख्य जकातदार असून खूप श्रीमंत होता.

लूक 19:3 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करीत होता पण गर्दीमुळे त्याचे काही चालेना, कारण तो ठेंगणा होता.

लूक 19:4 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तेव्हा तो सर्वांच्या पुढे पळत गेला आणि येशूला पाहण्यासाठी एका उंबराच्या झाडावर चढला कारण तो त्याच रस्त्याने पुढे जाणार होता.

लूक 19:5 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मग येशू त्याठिकाणी येताच दृष्टी वर करून त्यास म्हणाला, “जक्कया, त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरायचे आहे.”

लूक 19:6 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे आगत-स्वागत केले.

लूक 19:7 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले की, “पापी मनुष्याच्या घरी हा उतरायला गेला आहे.”

लूक 19:8 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तेव्हा जक्कय उभा राहून प्रभूला म्हणाला, “प्रभूजी, पाहा, मी आपले अर्धे धन गरिबांस देतो आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असले तर ते चौपट परत करतो.”

लूक 19:9 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
येशू त्यास म्हणाला, “आज या घराचे तारण झाले आहे कारण हा मनुष्यसुद्धा अब्राहामाचा मुलगा आहे.

लूक 19:10 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
कारण मनुष्याचा पुत्र जे हरवलेले ते शोधण्यास आणि तारण्यास आला आहे.”

लूक 19:11 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
ते या गोष्टी ऐकत असता त्याने त्यास एक दाखलाही सांगितला कारण तो यरूशलेम शहराजवळ होता आणि देवाचे राज्य आताच प्रकट होणार आहे असे त्यांना वाटत होते.

लूक 19:12 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तो म्हणाला, “कोणीएक उमराव, आपण राज्य मिळवून परत यावे या उद्देशाने दूरदेशी गेला.

लूक 19:13 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
त्याने आपल्या दहा दासांना बोलावले व त्यांना दहा नाणी देऊन सांगितले, ‘मी येईपर्यंत त्यावर व्यापार करा.’

लूक 19:14 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
त्याच्या नगरचे लोक त्याचा द्वेष करत म्हणून त्यांनी त्याच्या मागोमाग वकील पाठवून सांगितले, ‘ह्याने आमच्यावर राज्य करावे अशी आमची इच्छा नाही.’

लूक 19:15 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मग असे झाले कि, तो राज्य मिळवून पुन्हा परत आल्यावर ज्यांना त्याने व्यापाराकरिता पैसा दिला होता, त्यावर किती नफा झाला हे समजावे म्हणून दासांना आज्ञा देऊन त्यांना बोलावीले.

लूक 19:16 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
पहिला पुढे आला आणि म्हणाला, ‘धनी तुम्ही दिलेल्या नाण्यावर मी आणखी दहा नाणी मिळवली आहेत.’

लूक 19:17 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तेव्हा तो त्यास म्हणाला, ‘चांगल्या दासा, छान केलेस, तू थोडक्यांविषयी विश्वासू झालास, म्हणून तू दहा नगरांवर अधिकारी होशील.’

लूक 19:18 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मग दुसरा आला व म्हणाला, ‘धनी, तुमच्या पाच नाण्यांवर मी पाच नाणी आणखी मिळवली.’

लूक 19:19 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
आणि तो त्यास म्हणाला, ‘तू पाच नगरांवर अधिकारी असशील.’

लूक 19:20 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मग आणखी एक दास आला आणि म्हणाला, ‘धनी, आपण दिलेले नाणे मी हातरुमालात बांधून ठेवले होते.

लूक 19:21 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
आपण कठोर आहात, जे आपण ठेवले नाही, ते आपण काढता आणि जे पेरले नाही, ते कापता. म्हणून मला तुमची भीती वाटत होती,’

लूक 19:22 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
धनी त्यास म्हणाला, ‘दुष्ट दासा, तुझ्याच शब्दांनी मी तुझा न्याय करतो. तुला ठाऊक होते की मी कडक शिस्तीचा मनुष्य आहे. मी जे दिले नाही ते घेतो आणि जे पेरले नाही त्याची कापणी करतो,

लूक 19:23 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तर तू माझा पैसा पेढीवर का ठेवला नाहीस? मग जेव्हा मी परत आलो असतो तेव्हा ते मला व्याजासह मिळाले असते.’

लूक 19:24 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
त्याच्याजवळ उभे राहणाऱ्यांना तो म्हणाला, ‘त्याच्यापासून ते नाणे घ्या आणि ज्याच्याजवळ दहा नाणी आहेत, त्यास द्या.’

लूक 19:25 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
ते त्यास म्हणाले, ‘धनी, त्याच्याजवळ दहा नाणी आहेत.’

लूक 19:26 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
धन्याने उत्तर दिले, ‘मी तुम्हास सांगतो, ज्याच्याजवळ आहे, त्यास अधिक दिले जाईल आणि ज्याच्याजवळ नाही, त्याच्याकडे जे काही असेल तेसुध्दा काढून घेतले जाईल.

लूक 19:27 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
परंतु मी राज्य करू नये अशी इच्छा करणाऱ्यांचा माझ्या शत्रूंना येथे आणा आणि माझ्यासमोर ठार मारा.’”

लूक 19:28 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
येशूने या गोष्टी सांगितल्यावर तो वर यरूशलेम शहरापर्यंत गेला.

लूक 19:29 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तो वर जातांना, जेव्हा तो जैतून डोंगर म्हटलेल्या टेकडीनजीक असलेल्या बेथफगे आणि बेथानीजवळ आला तेव्हा त्याने आपल्या दोन शिष्यांना असे सांगून पाठवले,

लूक 19:30 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
व म्हटले, “तुमच्यासमोर असलेल्या खेड्यात जा. तुम्ही प्रवेश करताच, ज्यावर कोणी बसले नाही असे शिंगरु तुम्हास बांधलेले आढळेल. ते सोडून येथे आणा.

लूक 19:31 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
जर तुम्हास कोणी विचारले की, ‘तुम्ही ते का सोडता? तर म्हणा की, प्रभूला याची गरज आहे.’”

लूक 19:32 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
ज्यांना पाठवले होते, ते गेले आणि त्याने सांगितल्याप्रमाणे त्यास आढळले.

लूक 19:33 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
ते शिंगरु सोडीत असता त्याचा मालक त्यांना म्हणाला, “तुम्ही शिंगरु का सोडता?”

लूक 19:34 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
ते म्हणाले, “प्रभूला याची गरज आहे.”

लूक 19:35 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
त्यांनी ते येशूकडे आणले. त्यांनी आपले झगे शिंगरावर घातले आणि येशूला त्याच्यावर बसविले.

लूक 19:36 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
येशू रस्त्यावरुन जात असता लोक आपली वस्त्रे रस्त्यावर पसरीत होते.

लूक 19:37 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तो जेव्हा जैतून डोंगराच्या उतरावर आला तेव्हा सर्व शिष्यसमुदाय, त्यांनी जे चमत्कार पाहिले होते त्याबद्दल मोठ्या आनंदाने देवाची स्तुती करू लागला.

लूक 19:38 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
ते म्हणाले, “प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो! स्वर्गात शांती आणि ऊर्ध्वलोकी गौरव.”

लूक 19:39 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
जमावातील काही परूशी येशूला म्हणाले, “गुरुजी, आपल्या शिष्यांना गप्प राहण्यास सांगा.”

लूक 19:40 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
त्याने उत्तर दिले, “मी तुम्हास सांगतो, जर ते शांत बसतील तर हे धोंडे ओरडतील.”

लूक 19:41 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तो जेव्हा जवळ आला व त्याने शहर पाहिले, तेव्हा तो त्यासाठी रडला आणि म्हणाला,

लूक 19:42 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
“कोणत्या गोष्टी तुला शांती देतील ते जर आज तू जाणून घेतले असते तर! परंतु आता त्या तुझ्या नजरेपासून लपवून ठेवण्यात आल्या आहेत.

लूक 19:43 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तुझ्यावर असे दिवस येतील की, तुझे शत्रू तुझ्याभोवती कोट उभारतील. तुला वेढतील आणि सर्व बाजूंनी तुला कोंडीत पकडतील.

लूक 19:44 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
ते तुला, तुझ्या मुलांना तुझ्या भिंतीच्या आत धुळीस मिळवतील व दगडावर दगड राहू देणार नाही कारण तू देवाचा तुझ्याकडे येण्याचा समय तू ओळखला नाही.”

लूक 19:45 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
येशूने परमेश्वराच्या भवनात प्रवेश केला व विक्री करीत होते त्यांना बाहेर घालवू लागला.

लूक 19:46 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
आणि त्यांना म्हणाला, “पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, माझे घर प्रार्थनेचे घर होईल, पण तुम्ही ते लुटारुची गुहा केली आहे.”

लूक 19:47 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तो दररोज परमेश्वराच्या भवनात शिकवीत असे. मुख्य याजक लोक, नियमशास्त्राचे शिक्षक, लोकांचे पुढारी त्यास ठार मारण्याचा प्रयत्न करीत होते.

लूक 19:48 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
पण तसे करण्यासाठी त्यांना काही मार्ग सापडत नव्हता कारण सर्व लोक त्याचे मन लावून ऐकत असत.
Previous Chapter
« लूक 18 (MARIRV)

Available Bible Translations

American Standard Version
Luke 19 (ASV) »
King James Version
Luke 19 (KJV) »
GOD’S WORD® (GW)
Luke 19 (GW) »
Berean Bible
Luke 19 (BSB) »
World English Bible
Luke 19 (WEB) »
Louis Segond 1910
Luc 19 (LSG) »
Luther Bibel 1912
Lukas 19 (LUTH1912) »
इंडियन रिवाइज्ड वर्जन - हिंदी
लूका 19 (HINIRV) »
ਭਾਰਤੀ ਸੋਧਿਆ ਹੋਇਆ ਸੰਸਕਰਣ - ਪੰਜਾਬੀ
ਲੂਕਾ 19 (PANIRV) »
ভারতীয় সংশোধিত সংস্করণ - বাংলা
লূক 19 (BENIRV) »
இந்தியன் ரீவைஸ்டு வேர்ஷன் - தமிழ்
லூக்கா 19 (TAMIRV) »
ఇండియన్ రేవిజ్డ్ వెర్షన్ - తెలుగు
లూకా 19 (TELIRV) »
ઇન્ડિયન રિવાયઝ્ડ વર્ઝન - ગુજરાતી
લૂક 19 (GUJIRV) »
ಭಾರತೀಯ ಪರಿಷ್ಕೃತ ಆವೃತ್ತಿ - ಕನ್ನಡ
ಲೂಕನು 19 (KANIRV) »
الكتاب المقدس باللغة العربية، فان دايك
لُوقا 19 (AVD) »
Bíblia Sagrada Português
Lucas 19 (BSL) »
Kinh Thánh: Tiếng Việt
Lu-ca 19 (VIE) »
Reina Valera Antigua
Lucas 19 (RVA) »
La Sacra Bibbia
Luca 19 (RIV) »
圣 经 简体中文和合本
路 加 福 音 19 (CUVS) »
聖 經 繁體中文和合本
路 加 福 音 19 (CUVT) »
Bibla e Shenjtë
Luka 19 (ALB) »
Svenska Bibeln 1917
Lukas 19 (SV1917) »
Библия на русском
Луки 19 (RUSV) »
Українська Біблія
Луки 19 (UKR) »
Szent Biblia - Magyar
Lukács 19 (KAR) »
Българска Библия
Лука 19 (BULG) »
Det Norsk Bibel
Lukas 19 (NORSK) »
Biblia Takatifu
Luka 19 (SWHULB) »
Kitaabka Quduuska Ah
Luukos 19 (SOM) »
De Heilige Schrift
Lukas 19 (NLD) »
Dansk Bibel 1871
Lukas 19 (DA1871) »

लूक (MARIRV) Chapter Selection

MARIRV Book Selection List