गणना Chapter 10 MARIRV Bible Verse Images

गणना 10 Bible Verse Pictures. Choose from a large collection of inspirational, motivational and encouraging Bible verses with pictures of nature. Download and share गणना 10 inspirational Bible verse images. Bible verse pictures were created based on verses from the Indian Revised Version (IRV) - Marathi. IRV-Marathi Bible verse images were generated with permission from Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS).

Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.
Please remember to give attribution to Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. when using IRV-Marathi Bible Verse images. You can use CC-licensed materials as long as you follow the license conditions. One condition of all CC licenses is attribution.

Creative Commons License

Terms of Use: This work is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. It is attributed to Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS), and the Unified Scripture XML (USX) format version can be found on the Digital Bible Library website. All IRV-Marathi Bible verse images were generated with permission from Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS).

In addition, we would like to give very special thanks to eBible.org for making the Marathi Indian Revised Version Bible available in MySQL format.


गणना 10:1 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,

गणना 10:2 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
चांदीचे दोन कर्णे बनव. चांदी ठोकून ते बनव. मंडळीला एकत्र बोलवण्यासाठी आणि त्यांचा तळ हलविण्यासाठी या कर्ण्यांचा उपयोग करावा.

गणना 10:3 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
सर्व मंडळीला दर्शनमंडपाच्या प्रवेशद्वारासमोर एकत्र बोलविण्यासाठी याजकाने कर्णे वाजवावे.

गणना 10:4 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
जर याजकाने एकच कर्णा वाजविला तर मग अधिकाऱ्यांनी, इस्राएलांच्या वंशाच्या अधिपतीनी तुझ्याकडे जमावे.

गणना 10:5 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
जेव्हा तू कर्णा मोठ्याने फुंकून इशारा दिला म्हणजे पूर्वेकडील छावण्यांनी त्यांचा प्रवासास सुरवात करावी.

गणना 10:6 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
जेव्हा दुसऱ्या वेळी मोठ्याने फुंकून इशारा दिला म्हणजे तेव्हा दक्षिणेकडील छावण्यांनी प्रवासास सुरवात करावी; त्यांच्या प्रवासासाठी मोठ्याने फुंकून इशारा द्यावा.

गणना 10:7 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
जेव्हा मंडळीला एकत्र जमावावयाचे असेल तेव्हा कर्णा फुंका, पण मोठ्याने फुंकू नये.

गणना 10:8 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
अहरोनाचे मुले, याजक, यांनीच कर्णे वाजवावीत. हा तुमच्या लोकांस पिढ्यानपिढ्याचा कायमचा नियम आहे.

गणना 10:9 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तुम्ही जेव्हा तुमच्या देशात तुम्हावर जुलूम करणाऱ्या शत्रूविरूद्ध लढायला जाता, मग तेव्हा तुम्ही कर्ण्याचा गजर करा. मी, परमेश्वर, तुमचा देव तुमची आठवण करीन आणि तुमच्या शत्रूपासून तुमचे रक्षण करील.

गणना 10:10 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तसेच तुम्ही आनंदाच्या प्रसंगी, तुमचे दोन्ही नियमीत सण व महिन्याच्या सुरवातीच्या दिवशी तुमची होमार्पणाच्या, शांत्यर्पणाच्या यज्ञांच्या सन्मानासाठी तुम्ही कर्णे वाजवावेत. तुमच्या परमेश्वरास तुमची आठवण करून देण्याची ही एक कृती आहे. हे तुम्ही करावे अशी मी तुम्हास आज्ञा देतो. मी तुमचा देव परमेश्वर आहे.

गणना 10:11 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
दुसऱ्या वर्षी, दुसऱ्या महिन्यात, महिन्याच्या विसाव्या दिवशी, साक्षपटाच्या निवासमंडपापासून ढग वर घेतला गेला.

गणना 10:12 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तेव्हा इस्राएल लोक सीनाय रानातून आपल्या प्रवासास निघाले. ढग पारानाच्या रानात थांबला.

गणना 10:13 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
परमेश्वराने मोशेच्याद्वारे दिलेल्या आज्ञेप्रमाणे त्यांनी हा पहिला प्रवास केला.

गणना 10:14 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
पहिल्याने यहूदा वंशाच्या छावणीच्या निशाणाखालील त्यांच्या वैयक्तिक सैन्यासह बाहेर निघाले. अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन यहूदाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.

गणना 10:15 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
सुवाराचा मुलगा नथनेल इस्साखार वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.

गणना 10:16 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
हेलोनाचा मुलगा अलीयाब जबुलून वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.

गणना 10:17 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
गेर्षोन व मरारी वंश निवासमंडपाची काळजी घेण्यासाठी होते, त्यांनी निवासमंडप खाली काढला आणि मग तो उचलून घेऊन त्यांच्या प्रवासास सुरवात केली.

गणना 10:18 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
त्यानंतर, रऊबेनाच्या निशाणाखालील छावणीतील सैन्यांनी त्यांच्या प्रवासास सुरवात केली. शदेयुराचा मुलगा अलीसूर त्यांच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.

गणना 10:19 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
सुरीशाद्दैचा मुलगा शलूमीयेल शिमोन वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.

गणना 10:20 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
रगुवेलाचा मुलगा एल्यासाप गाद वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.

गणना 10:21 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
कहाथींनी प्रवासास सुरवात केली. ते पवित्रस्थानातील पवित्र वस्तू घेऊन निघाले. ते पुढच्या तळावर जाऊन पोहोचेपर्यंत अगोदरच्या इतरांनी पवित्र निवासमंडप उभा करून तयार ठेवला होता.

गणना 10:22 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
त्यानंतर एफ्राइम वंशाच्या निशाणाखालील छावणीतील सैन्यांनी प्रवासास सुरवात केली. अम्मीहूदाचा मुलगा अलीशामा त्यांच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.

गणना 10:23 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
पदाहसुराचा मुलगा गमलीयेल मनश्शे वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.

गणना 10:24 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
गिदोनीचा मुलगा अबीदान बन्यामीन वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.

गणना 10:25 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
दान वंशाच्या निशाणाखालील सैन्यांची शेवटची छावणी होती. अम्मीशाद्दै चा मुलगा अहीएजर दान वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.

गणना 10:26 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
आक्रानाचा मुलगा पगीयेल आशेर वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.

गणना 10:27 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
एनानाचा मुलगा अहीरा नफताली वंशाच्या सैन्याच्या अग्रस्थानी होता.

गणना 10:28 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
ह्याप्रकारे इस्राएल लोकांचे सैन्य त्यांच्या प्रवासास सुरवात करीत.

गणना 10:29 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मोशेने आपला सासरा मिद्यानी रगुवेल ह्याचा मुलगा होबाब ह्याच्याशी बोलला. रगुवेल मोशेच्या पत्नीचा पिता होता. मोशे होबेबाशी बोलला व म्हणाला, “परमेश्वराने वर्णन केलेल्या देशात आम्ही जात आहोत. तो देश देण्याचे परमेश्वराने आम्हास वचन दिले आहे. तू आमच्याबरोबर ये आणि आम्ही तुझे चांगले करू. परमेश्वराने इस्राएल लोकांसाठी चांगले करण्याचे वचन दिले आहे.”

गणना 10:30 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
परंतु होबाबाने उत्तर दिले “मी तुमच्याबरोबर येणार नाही. मी माझ्या देशात व माझ्या स्वतःच्या लोकात जाईल.”

गणना 10:31 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मग मोशेने त्यास उत्तर दिले, “कृपा करून तू आम्हास सोडून जाऊ नको. तुला रानात कसा तळ द्यायचा हे माहित आहे. तू आमचा वाटाड्या हो.

गणना 10:32 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तू जर आमच्याबरोबर येशील तर परमेश्वर जे काही आमचे चांगले करील तेच आम्ही तुझे करू.”

गणना 10:33 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
परमेश्वराच्या पर्वतापासून तीन दिवसाचा प्रवास करीत गेले. परमेश्वराच्या कराराचा कोश त्यांच्या विसाव्यासाठी जागा शोधायला तीन दिवसाच्या वाटेवर त्यांच्यापुढे गेला.

गणना 10:34 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
जसा ते प्रवास करत होते तसा परमेश्वराचा ढग दिवसरात्र त्यांच्यावर होता.

गणना 10:35 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
जेव्हा कराराचा कोश प्रवासास निघत तेव्हा मोशे म्हणत असे, “हे परमेश्वरा, ऊठ, तुझ्या शत्रूंची पांगापांग कर, जे तुझा द्वेष करतात ते तुझ्यापासून पळून जावोत.”

गणना 10:36 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
जेव्हा कराराचा कोश थांबत असे, तेव्हा मोशे म्हणत असे, “हे परमेश्वरा, इस्राएलाच्या लाखो लोकांकडे परत ये.”

Available Bible Translations

American Standard Version
Numbers 10 (ASV) »
King James Version
Numbers 10 (KJV) »
GOD’S WORD® (GW)
Numbers 10 (GW) »
World English Bible
Numbers 10 (WEB) »
Louis Segond 1910
Nombres 10 (LSG) »
Luther Bibel 1912
Numeri 10 (LUTH1912) »
इंडियन रिवाइज्ड वर्जन - हिंदी
गिनती 10 (HINIRV) »
ਭਾਰਤੀ ਸੋਧਿਆ ਹੋਇਆ ਸੰਸਕਰਣ - ਪੰਜਾਬੀ
ਗਿਣਤੀ 10 (PANIRV) »
ভারতীয় সংশোধিত সংস্করণ - বাংলা
গননা 10 (BENIRV) »
இந்தியன் ரீவைஸ்டு வேர்ஷன் - தமிழ்
எண்ணாகமம் 10 (TAMIRV) »
ఇండియన్ రేవిజ్డ్ వెర్షన్ - తెలుగు
సంఖ్యాకాండం 10 (TELIRV) »
ઇન્ડિયન રિવાયઝ્ડ વર્ઝન - ગુજરાતી
ગણના 10 (GUJIRV) »
ಭಾರತೀಯ ಪರಿಷ್ಕೃತ ಆವೃತ್ತಿ - ಕನ್ನಡ
ಅರಣ್ಯಕಾಂಡ 10 (KANIRV) »
الكتاب المقدس باللغة العربية، فان دايك
اَلْعَدَد 10 (AVD) »
תנ ך עברי מודרני
במדבר 10 (HEB) »
Bíblia Sagrada Português
Números 10 (BSL) »
Kinh Thánh: Tiếng Việt
Dân Số 10 (VIE) »
Reina Valera Antigua
Números 10 (RVA) »
La Sacra Bibbia
Numeri 10 (RIV) »
圣 经 简体中文和合本
民 数 记 10 (CUVS) »
聖 經 繁體中文和合本
民 數 記 10 (CUVT) »
Bibla e Shenjtë
Numrat 10 (ALB) »
Svenska Bibeln 1917
4 Mosebok 10 (SV1917) »
Библия на русском
Числа 10 (RUSV) »
Українська Біблія
Числа 10 (UKR) »
Szent Biblia - Magyar
4 Mózes 10 (KAR) »
Българска Библия
Числа 10 (BULG) »
聖書 日本語
民数記 10 (JPN) »
Biblia Takatifu
Hesabu 10 (SWHULB) »
Kitaabka Quduuska Ah
Tirintii 10 (SOM) »
De Heilige Schrift
Numberi 10 (NLD) »

गणना (MARIRV) Chapter Selection

MARIRV Book Selection List