स्तोत्रसंहिता Chapter 18 MARIRV Bible Verse Images

स्तोत्रसंहिता 18 Bible Verse Pictures. Choose from a large collection of inspirational, motivational and encouraging Bible verses with pictures of nature. Download and share स्तोत्रसंहिता 18 inspirational Bible verse images. Bible verse pictures were created based on verses from the Indian Revised Version (IRV) - Marathi. IRV-Marathi Bible verse images were generated with permission from Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS).

Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.
Please remember to give attribution to Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. when using IRV-Marathi Bible Verse images. You can use CC-licensed materials as long as you follow the license conditions. One condition of all CC licenses is attribution.

Creative Commons License

Terms of Use: This work is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. It is attributed to Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS), and the Unified Scripture XML (USX) format version can be found on the Digital Bible Library website. All IRV-Marathi Bible verse images were generated with permission from Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS).

In addition, we would like to give very special thanks to eBible.org for making the Marathi Indian Revised Version Bible available in MySQL format.


स्तोत्रसंहिता 18:1 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मुख्य गायकासाठी, परमेश्वराचा सेवक दावीद याचे स्तोत्र. परमेश्वराने त्यास त्याच्या सर्व शत्रूंच्या हातातून आणि शौलाच्या हातातून सोडवले, त्या दिवशी तो या गीताची वचने परमेश्वरापाशी बोलला, आणि तो म्हणाला. “हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्या, मी तुझ्यावर प्रेम करतो.”

स्तोत्रसंहिता 18:2 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
परमेश्वर माझा खडक माझा गढ आहे, जो मला सुरक्षा देतो, तो माझा देव, माझा खडक आहे, त्याच्यात मी आश्रय घेतो. तो माझी ढाल आहे, माझ्या तारणाचे शिंग आणि माझा बळकट दुर्ग आहे.

स्तोत्रसंहिता 18:3 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
जो स्तुतीच्या योग्य आहे, त्या परमेश्वरास मी हाक मारीन, आणि मी माझ्या शत्रूंपासून वाचवला जाईन.

स्तोत्रसंहिता 18:4 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मृत्यूच्या दोऱ्यांनी मला घेरीले, आणि नाशाच्या पुरांनी मला घाबरे केले आहे.

स्तोत्रसंहिता 18:5 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
अधोलोकांच्या बंधनांनी मला घेरीले, मृत्यूच्या सापळ्याने मला अडकवले.

स्तोत्रसंहिता 18:6 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मी संकटात असता, मी परमेश्वरास हाक मारली; मी देवाला माझ्या मदतीसाठी हाक मारली. त्याने त्याच्या पवित्र मंदिरातून माझी वाणी ऐकली.

स्तोत्रसंहिता 18:7 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तेव्हा पृथ्वी हादरली आणि कंपित झाली. डोंगरांचे पाये थरथर कापले आणि हादरले, कारण देव क्रोधित झाला होता.

स्तोत्रसंहिता 18:8 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
त्याच्या नाकातून धूर वर चढला, आणि त्याच्या तोंडातून अग्नीच्या ज्वाला निघाल्या, ज्याने कोळसे पेटले गेले.

स्तोत्रसंहिता 18:9 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
त्याने आकाश उघडले आणि तो खाली आला, आणि निबिड अंधार त्याच्या पाया खाली होता.

स्तोत्रसंहिता 18:10 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तो करुबावर स्वार झाला आणि वाऱ्याच्या पंखांनी वर उडत गेला.

स्तोत्रसंहिता 18:11 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
पावसाचे मोठे काळोख असे मेघ त्याने त्याच्याभोवती तंबू असे केले,

स्तोत्रसंहिता 18:12 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
त्याच्या समोरील तेजामुळे, गारा आणि जळते कोळसे बाहेर पडले.

स्तोत्रसंहिता 18:13 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
परमेश्वराने आकाशात गडगडाट केला! परात्पराने आवाज उंच केला, गारा आणि विजा बाहेर पडल्या.

स्तोत्रसंहिता 18:14 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
परमेश्वराने त्याचे बाण सोडले आणि शत्रूंची दाणादाण उडाली, पुष्कळ विजांनी त्यांना छेदून टाकले.

स्तोत्रसंहिता 18:15 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तेव्हा जलाशयाचे तळ दिसू लागले, तुझ्या युद्धाच्या गदारोळाने आणि तुझ्या नाकपुड्याच्या श्वासाच्या सोसाट्याने हे परमेश्वरा, जगाचे पाये उघडे पडले.

स्तोत्रसंहिता 18:16 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तो उंचावरून खाली आला आणि त्याने मला पकडले! त्याने मला उसळत्या पाण्यातून बाहेर काढले.

स्तोत्रसंहिता 18:17 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
माझ्या शक्तीशाली शत्रूंपासून आणि माझा तिरस्कार करणाऱ्यांपासून त्याने मला सोडवले. कारण ते माझ्यापेक्षा अधिक बलवान होते.

स्तोत्रसंहिता 18:18 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
माझ्या दु:खाच्या दिवशी ते माझ्याविरूद्ध आले; परंतु परमेश्वर मला उचलून धरणारा होता.

स्तोत्रसंहिता 18:19 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
त्याने मला विस्तृत खुल्या जागेमध्ये मोकळे केले! त्याने मला तारले कारण तो माझ्यामुळे संतुष्ट होता.

स्तोत्रसंहिता 18:20 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
माझ्या न्यायीपणाप्रमाणे परमेश्वराने मला पुरस्कृत केले आहे, त्याने मला पुनसंचयित केले कारण माझे हात निर्मळ होते.

स्तोत्रसंहिता 18:21 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
कारण मी परमेश्वराच्या मार्गात राहिलो आणि दुष्टाईने देवापासून दूर फिरलो नाही.

स्तोत्रसंहिता 18:22 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
कारण त्याचे धार्मिक नियम माझ्यापुढे होते आणि त्याचे नियम मी आपणापासून दूर केले नाहीत.

स्तोत्रसंहिता 18:23 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मी त्याच्यासमोर निर्दोष असा होतो, आणि मी स्वत:ला पापापासून दूर राखले.

स्तोत्रसंहिता 18:24 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
माझ्या न्यायीपणाप्रमाणे परमेश्वराने पुनसंचयित केले. कारण त्याच्या डोळ्यासमोर माझे हात निर्मळ होते.

स्तोत्रसंहिता 18:25 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
जो विश्वासयोग्य आहे, त्याच्याशी तू विश्वास दाखवतोस, निर्दोष मनुष्याशी तू सात्विकतेने वागतोस.

स्तोत्रसंहिता 18:26 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
जे शुद्ध असतात त्यांच्याशी तू शुद्ध असतोस, परंतु जे कुटील त्यांच्याशी तू कुटीलतेने वागतोस.

स्तोत्रसंहिता 18:27 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
कारण तू पीडित लोकांस वाचविले आहेस. परंतु गर्वाने उंचावलेल्या डोळ्यांना तू खाली करतोस.

स्तोत्रसंहिता 18:28 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
कारण तू माझा दिवा लावशील, परमेश्वर माझा देव माझ्या अंधाराचा प्रकाश करितो.

स्तोत्रसंहिता 18:29 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
कारण तुझ्या मदतीने मी फौजेविरूद्ध जाऊ शकतो, माझ्या देवाच्या योगे मी तटावरुन उडी मारून जाऊ शकतो.

स्तोत्रसंहिता 18:30 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
देवाचा मार्ग परिपूर्ण आहे. परमेश्वराचे वचन शुद्ध आहे. जे त्याच्यात आश्रय घेतात, त्यांच्यासाठी तो ढाल असा आहे.

स्तोत्रसंहिता 18:31 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
कारण परमेश्वराखेरीज कोण देव आहे? आमच्या देवाशिवाय कोण खडक आहे?

स्तोत्रसंहिता 18:32 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तोच देव बलाने माझी कंबर बांधतो, जो माझे मार्ग सुरक्षित ठेवतो.

स्तोत्रसंहिता 18:33 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तो माझे पाय हरिणीसारखे चपळ करतो आणि मला डोंगरावर ठेवतो!

स्तोत्रसंहिता 18:34 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तो माझ्या हाताला युद्ध करावयाला आणि माझे भुज पितळी धनुष्य वाकवायला शिकवतो.

स्तोत्रसंहिता 18:35 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तू मला तुझ्या तारणाची ढाल दिली आहेस, तुझा उजवा हात मला आधार देतो आणि तुझ्या अनुग्रहाने मला थोर केले आहे.

स्तोत्रसंहिता 18:36 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तू माझ्या पायांखाली विस्तीर्ण असे स्थान केले आहे, म्हणजे माझे पाय कधीही घसरणार नाहीत.

स्तोत्रसंहिता 18:37 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मी माझ्या शत्रूंचा पाठलाग करीन आणि त्यांना पकडीन. ते नाश होईपर्यंत मी मागे फिरणार नाही.

स्तोत्रसंहिता 18:38 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मी माझ्या शत्रूंना असे मारीन की, ते पुन्हा उभे राहू शकणार नाहीत, ते सगळे माझ्या पायाखाली असतील.

स्तोत्रसंहिता 18:39 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
कारण युद्धाकरिता तू सामर्थ्याने माझी कंबर बांधली आहे, जे माझ्याविरूद्ध उठले होते त्यांना तू खाली पाडले आहे.

स्तोत्रसंहिता 18:40 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तू मला माझ्या शत्रूंनाही त्यांची पाठ फिरवायला लावली आहे, ज्यांनी माझा द्वेष केला, त्यांचा मी नाश केला.

स्तोत्रसंहिता 18:41 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
ते मदतीसाठी ओरडले, पण कोणीही त्यांना वाचवले नाही, त्यांनी परमेश्वरास आरोळी केली, पण त्याने उत्तर दिले नाही.

स्तोत्रसंहिता 18:42 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मी माझ्या शत्रूंचे वाऱ्यावर उडणाऱ्या धुळीप्रमाणे चूर्ण केले, रस्त्यावरील चिखलाप्रमाणे मी त्यांना काढून टाकले.

स्तोत्रसंहिता 18:43 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मी त्यांना असे मारले की धुळीसारखा त्यांचा भुगा केला, तू मला राष्ट्रांवर मस्तक असे केले आहे. जे लोक मला माहित नाहीत ते माझी सेवा करतील.

स्तोत्रसंहिता 18:44 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
ते लोक माझ्याविषयी ऐकतील आणि लगेच माझ्या आज्ञांचे पालन करतील, ते परदेशी माझ्यापुढे शरण येतील.

स्तोत्रसंहिता 18:45 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
ते परदेशी त्यांच्या लपण्याच्या जागेतून भीतीने थरथर कापत बाहेर येतील.

स्तोत्रसंहिता 18:46 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
परमेश्वर जिवंत आहे, माझा खडक धन्यवादित असो. माझ्या तारणाचा देव उंचावला जावो.

स्तोत्रसंहिता 18:47 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
हाच तो देव आहे जो माझ्यासाठी सूड घेतो, तो त्या राष्ट्रांना माझ्या सत्तेखाली देतो.

स्तोत्रसंहिता 18:48 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मी माझ्या शत्रूंपासून मुक्त झालो आहे, खचित, जे माझ्याविरूद्ध उठले आहेत, त्यांच्यावर तू मला उंच केले आहे. तू मला क्रूर मनुष्यांपासून वाचवले.

स्तोत्रसंहिता 18:49 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
यास्तव परमेश्वरा, राष्ट्रांमध्ये मी तुला धन्यवाद देईन, मी तुझ्या नावाची स्तुती गाईन.

स्तोत्रसंहिता 18:50 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
देव आपल्या राजाला मोठा विजय देतो, आणि तो आपल्या अभिषिक्तावर, दाविदावर व त्याच्या संतानावर सदासर्वकाळ कृपा करतो.

Available Bible Translations

American Standard Version
Psalms 18 (ASV) »
King James Version
Psalms 18 (KJV) »
GOD’S WORD® (GW)
Psalms 18 (GW) »
World English Bible
Psalms 18 (WEB) »
Louis Segond 1910
Psaumes 18 (LSG) »
Luther Bibel 1912
Psalm 18 (LUTH1912) »
इंडियन रिवाइज्ड वर्जन - हिंदी
भजन संहिता 18 (HINIRV) »
ਭਾਰਤੀ ਸੋਧਿਆ ਹੋਇਆ ਸੰਸਕਰਣ - ਪੰਜਾਬੀ
ਜ਼ਬੂਰ 18 (PANIRV) »
ভারতীয় সংশোধিত সংস্করণ - বাংলা
গীতমালা 18 (BENIRV) »
இந்தியன் ரீவைஸ்டு வேர்ஷன் - தமிழ்
சங்கீதங்கள் 18 (TAMIRV) »
ఇండియన్ రేవిజ్డ్ వెర్షన్ - తెలుగు
కీర్తన 18 (TELIRV) »
ઇન્ડિયન રિવાયઝ્ડ વર્ઝન - ગુજરાતી
ગીતશાસ્ત્ર 18 (GUJIRV) »
ಭಾರತೀಯ ಪರಿಷ್ಕೃತ ಆವೃತ್ತಿ - ಕನ್ನಡ
ಕೀರ್ತನೆಗಳು 18 (KANIRV) »
الكتاب المقدس باللغة العربية، فان دايك
اَلْمَزَامِيرُ 18 (AVD) »
תנ ך עברי מודרני
תהלים 18 (HEB) »
Bíblia Sagrada Português
Salmos 18 (BSL) »
Kinh Thánh: Tiếng Việt
Thánh Thi 18 (VIE) »
Reina Valera Antigua
Salmos 18 (RVA) »
La Sacra Bibbia
Salmi 18 (RIV) »
圣 经 简体中文和合本
诗 篇 18 (CUVS) »
聖 經 繁體中文和合本
詩 篇 18 (CUVT) »
Bibla e Shenjtë
Psalmet 18 (ALB) »
Svenska Bibeln 1917
Psaltaren 18 (SV1917) »
Библия на русском
Псалтирь 18 (RUSV) »
Українська Біблія
Псалми 18 (UKR) »
Szent Biblia - Magyar
Zsoltárok 18 (KAR) »
Българска Библия
Псалми 18 (BULG) »
聖書 日本語
詩篇 18 (JPN) »
Det Norsk Bibel
Salmene 18 (NORSK) »
Biblia Takatifu
Zaburi 18 (SWHULB) »
Kitaabka Quduuska Ah
Sabuurradii 18 (SOM) »
De Heilige Schrift
Psalmen 18 (NLD) »
Dansk Bibel 1871
Salme 18 (DA1871) »

MARIRV Book Selection List