मत्तय Chapter 20 MARIRV Bible Verse Images

मत्तय 20 Bible Verse Pictures. Choose from a large collection of inspirational, motivational and encouraging Bible verses with pictures of nature. Download and share मत्तय 20 inspirational Bible verse images. Bible verse pictures were created based on verses from the Indian Revised Version (IRV) - Marathi. IRV-Marathi Bible verse images were generated with permission from Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS).

Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.
Please remember to give attribution to Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. when using IRV-Marathi Bible Verse images. You can use CC-licensed materials as long as you follow the license conditions. One condition of all CC licenses is attribution.

Creative Commons License

Terms of Use: This work is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. It is attributed to Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS), and the Unified Scripture XML (USX) format version can be found on the Digital Bible Library website. All IRV-Marathi Bible verse images were generated with permission from Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS).

In addition, we would like to give very special thanks to eBible.org for making the Marathi Indian Revised Version Bible available in MySQL format.


मत्तय 20:1 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
“म्हणून स्वर्गाचे राज्य हे कोणा शेतमालकासारखे आहे. जो अगदी पहाटे त्याच्या द्राक्षमळ्यासाठी मोलाने मजूर आणण्यासाठी गेला.

मत्तय 20:2 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
त्या मनुष्याने एक दिवसाच्या मजुरीकरिता प्रत्येकाला एक चांदीचे नाणे देण्याचे कबूल केले आणि त्याने द्राक्षाच्या मळ्यात कामास पाठवले.

मत्तय 20:3 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास तो मनुष्य बाजारात गेला तेव्हा तेथे काही माणसे उभी असलेली त्यास दिसली. त्या लोकांस काहीच काम नव्हते.

मत्तय 20:4 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मग तो त्यांना म्हणाला, ‘तुम्हीसुद्धा माझ्या द्राक्षमळ्यात कामाला जा आणि जी योग्य मजुरी आहे ती मी तुम्हास देईन.’

मत्तय 20:5 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मग ते काम करण्यास मळ्यात गेले, तो मनुष्य बारा वाजता आणि तीन वाजता बाजारात गेला आणि त्या मनुष्याने आपल्या मळ्यात काम करण्यासाठी लोकांस दोन वेळा जाऊन मजुरीवर घेतले

मत्तय 20:6 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
पाच वाजता तो मनुष्य परत एकदा बाजारात गेला तेव्हा आणखी काही लोक उभे असलेले त्यास आढळले. त्याने त्यांना विचारले, ‘तुम्ही काही काम न करता दिवसभर येथे का बरे उभे राहिला आहात?’

मत्तय 20:7 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
त्या लोकांनी उत्तर दिले, ‘आम्हास कोणी काम दिले नाही.’ तो मनुष्य त्यांना म्हणाला, ‘तर मग तुम्ही जाऊन माझ्या द्राक्षमळ्यात काम करा.’

मत्तय 20:8 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
संध्याकाळी द्राक्षमळ्याचा मालक मुकादमाला म्हणाला, ‘मजुरांना बोलवा आणि त्यांना त्यांची मजुरी देऊन टाका, मी ज्यांना अगदी शेवटी कामावर आणले त्यांना अगोदर मजुरी द्या, नंतर बाकीच्या सर्वांना मजुरी द्या, मी कामावर रोजगारीने पहिल्याने बोलावलेल्यांना सर्वात शेवटी मजुरी द्या.’

मत्तय 20:9 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
जे मजूर संध्याकाळी साधारण पाच वाजता कामावर घेतले होते ते आपली मजुरी घेण्यासाठी आले. प्रत्येकाला एक नाणे मजुरी मिळाली.

मत्तय 20:10 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मग ज्यांना सुरूवातीला कामावर घेण्यात आले होते, ते आपली मजुरी घेण्यासाठी आले. त्यांना वाटत होते की, इतरांपेक्षा त्यांना जास्त पैसे मिळतील, पण त्या सर्वांना चांदीचे एकच नाणे मजुरी मिळाली.

मत्तय 20:11 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
त्यांनी ते घेतले व मालकाकडे तक्रार करू लागले.

मत्तय 20:12 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
ते म्हणाले, ‘ज्यांना शेवटी कामावर घेतले त्यांनी केवळ एक तासच काम केले. परंतु तुम्ही त्यांना आमच्या बरोबरीने मजुरी दिली. आम्ही मात्र दिवसभर उन्हात कष्ट केले.’

मत्तय 20:13 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
परंतु मळ्याचा मालक त्यांच्यातील एकाला म्हणाला, ‘मित्रा मी तुझ्याबाबतीत अन्याय करीत नाही. मी तुला एक चांदीचे नाणे मजुरी देईन यावर आपण सहमत झालो नाही का?

मत्तय 20:14 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
जे तुझे आहे ते घे आणि चालायला लाग, तुला दिली तितकीच मजुरी मला या शेवटच्या मनुष्यास द्यायची आहे.

मत्तय 20:15 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मी माझ्या पैशाचा वापर मला पाहिजे तसा करू शकत नाही का? मी लोकांशी चांगला आहे म्हणून, तुला हेवा वाटतो का?’

मत्तय 20:16 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
म्हणून आता जे शेवटचे आहेत ते पहिले होतील आणि पहिले ते शेवटचे होतील.”

मत्तय 20:17 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
येशू यरूशलेम शहराला जात असता त्याने त्याच्या शिष्यांना एकाबाजूला घेतले आणि त्यांना म्हणाला,

मत्तय 20:18 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
“पाहा, आपण यरूशलेम शहराकडे जात आहोत. मनुष्याच्या पुत्राला धरून मुख्य याजक लोक व नियमशास्त्राचे शिक्षक यांच्या हाती धरुन देण्यात येईल. ते त्यास मरणदंड ठरतील.

मत्तय 20:19 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
आणि थट्टा करावयास, फटके मारावयास व वधस्तंभावर खिळावयास त्यास परराष्ट्रीयांच्या हाती देतील. परंतु तिसऱ्या दिवशी तो परत जीवनात येईल.”

मत्तय 20:20 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
त्यानंतर जब्दीच्या मुलांची आई, आपल्या मुलांसह त्याच्याकडे आली. ती त्याच्या पाया पडली आणि तिने त्यास एक विनंती केली.

मत्तय 20:21 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
त्याने तिला विचारले, “तुला काय पाहिजे?” ती म्हणाली, “माझा एक मुलगा तुमच्या राज्यात तुमच्या उजवीकडे बसेल आणि दुसरा डावीकडे बसेल असे वचन द्या.”

मत्तय 20:22 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तो तिला म्हणाला, “तू काय मागत आहेस ते तुला समजत नाही! जो प्याला मी पिणार आहे तो तुम्हास पिता येईल काय?” ते म्हणाले, होय, “पिता येईल!”

मत्तय 20:23 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
येशू त्याना म्हणाला, “तुम्ही खरोखर माझ्या प्याल्यातून प्याल खरे, पण माझ्या उजव्या आणि डाव्या हाताला बसण्याचा मान कोणाला देणे हे ठरविणारा मी नाही, तर माझ्या पित्याने तो मान कोणाला द्यायचा हे ठरवले आहे.”

मत्तय 20:24 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
जेव्हा इतर दहा शिष्यांनी हे ऐकले तेव्हा ते त्या दोघां भावांवर नाराज झाला.

मत्तय 20:25 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मग येशूने त्यांना बोलावून म्हटले, “परराष्ट्रीय लोकांच्या राजांना लोकांवर आपली सत्ता आहे हे दाखवणे आवडले आणि त्यांच्या प्रमुख नेत्यांना आपले अधिकार वाटेल तसे वापरणे आवडते.

मत्तय 20:26 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
पण तुमचे वागणे तसे नसावे. जर तुमच्यातील कोणाला मोठे व्हायचे असेल तर त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे.

मत्तय 20:27 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
आणि ज्याला पहिला व्हावयाचे आहे त्याने दास झाले पाहिजे.

मत्तय 20:28 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
म्हणजे तुम्ही मनुष्याच्या पुत्रासारखे असले पाहिजे. जसा तो इतरांकडून सेवा करून घ्यायला आला नाही तर इतरांची सेवा करायला आणि अनेकांचे तारण व्हावे यासाठी आपला जीव खंडणी म्हणून देण्यासाठी आला.”

मत्तय 20:29 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
ते यरीहो शहर सोडत असताना, मोठा लोकसमुदाय त्याच्यामागे आला.

मत्तय 20:30 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
रस्त्याच्या कडेला दोन आंधळे बसले होते आणि जेव्हा त्यांनी ऐकले की, येशू तेथून जात आहे, तेव्हा ते मोठ्याने ओरडले, “प्रभू येशू, दाविदाच्या पुत्रा. आमच्यावर दया करा.”

मत्तय 20:31 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
जमावाने त्यांना दटावले व त्यांना शांत राहण्यास सांगितले. पण ते अधिकच मोठ्याने ओरडू लागले, “प्रभू, दाविदाच्या पुत्रा, आमच्यावर दया करा.”

मत्तय 20:32 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मग येशू थांबला आणि त्यांच्याशी बोलला, त्याने विचारले, “मी तुमच्यासाठी काय करावे अशी तुमची इच्छा आहे?”

मत्तय 20:33 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
त्या आंधळ्या मनुष्यांनी उत्तर दिले, “प्रभूजी, आम्हास दिसावे अशी आमची इच्छा आहे.”

मत्तय 20:34 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
येशूला त्यांच्यांबद्दल कळवळा आला आणि त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला. त्याच क्षणी त्यांना दिसू लागले आणि ते त्याच्यामागे गेले.

Available Bible Translations

American Standard Version (ASV)
Matthew 20 (ASV) »
King James Version (KJV)
Matthew 20 (KJV) »
GOD’S WORD® (GW)
Matthew 20 (GW) »
Berean Bible (BSB)
Matthew 20 (BSB) »
World English Bible (WEB)
Matthew 20 (WEB) »
French Bible (LSG)
Matthieu 20 (LSG) »
German Bible (LUTH1912)
Matthäus 20 (LUTH1912) »
Punjabi Bible (PANIRV)
ਮੱਤੀ 20 (PANIRV) »
Bengali Bible (BENIRV)
মথি 20 (BENIRV) »
Gujarati Bible (GUJIRV)
માથ્થી 20 (GUJIRV) »
Arabic Bible (AVD)
مَتَّى 20 (AVD) »
Portuguese Bible (BSL)
Mateus 20 (BSL) »
Vietnamese Bible (VIE)
Ma-thi-ơ 20 (VIE) »
Spanish Bible (RVA)
Mateo 20 (RVA) »
Italian Bible (RIV)
Matteo 20 (RIV) »
Chinese Simplified (CUVS)
马 太 福 音 20 (CUVS) »
Chinese Traditional (CUVT)
馬 太 福 音 20 (CUVT) »
Albanian Bible (ALB)
Mateu 20 (ALB) »
Swedish Bible (SV1917)
Matteus 20 (SV1917) »
Russian Bible (RUSV)
Матфея 20 (RUSV) »
Ukrainian Bible (UKR)
Матвія 20 (UKR) »
Hungarian Bible (KAR)
Máté 20 (KAR) »
Bulgarian Bible (BULG)
Матей 20 (BULG) »
Norwegian Bible (NORSK)
Matteus 20 (NORSK) »

मत्तय (MARIRV) Chapter Selection

MARIRV Book Selection List