मत्तय Chapter 12 MARIRV Bible Verse Images

मत्तय 12 Bible Verse Pictures. Choose from a large collection of inspirational, motivational and encouraging Bible verses with pictures of nature. Download and share मत्तय 12 inspirational Bible verse images. Bible verse pictures were created based on verses from the Indian Revised Version (IRV) - Marathi. IRV-Marathi Bible verse images were generated with permission from Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS).

Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.
Please remember to give attribution to Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. when using IRV-Marathi Bible Verse images. You can use CC-licensed materials as long as you follow the license conditions. One condition of all CC licenses is attribution.

Creative Commons License

Terms of Use: This work is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. It is attributed to Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS), and the Unified Scripture XML (USX) format version can be found on the Digital Bible Library website. All IRV-Marathi Bible verse images were generated with permission from Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS).

In addition, we would like to give very special thanks to eBible.org for making the Marathi Indian Revised Version Bible available in MySQL format.


मत्तय 12:1 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
त्यावेळी एका शब्बाथ दिवशी येशू धान्याच्या शेतामधून चालला होता. शिष्याना भूक लागली होती, म्हणून ते कणसे मोडून खाऊ लागले.

मत्तय 12:2 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
जेव्हा परूश्यांनी हे पाहिले, तेव्हा ते येशूला म्हणाले, “पाहा, तुमचे शिष्य शब्बाथ दिवशी जे करू नये ते करीत आहेत.”

मत्तय 12:3 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तेव्हा येशूने त्यांना म्हटले, दाविदाला व त्याच्याबरोबरच्या मनुष्यांना भूक लागली तेव्हा त्याने काय केले, हे तुम्ही कधी वाचले नाही काय?

मत्तय 12:4 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तो देवाच्या भवनात कसा गेला आणि ज्या समर्पित भाकरी त्याने व त्याच्याबरोबरच्या लोकांनी खाऊ नयेत, असे करणे नियमशास्त्राच्या विरूद्ध होते. फक्त याजकांनाच ती भाकर खाण्याची परवानगी होती. त्या त्यांनी कशा खाल्ल्या?

मत्तय 12:5 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
आणि प्रत्येक शब्बाथाच्या दिवशी परमेश्वराच्या भवनातील याजक भवनात शब्बाथ पवित्र पाळण्याविषयीचा नियम मोडीत असत हे तुम्ही नियमशास्त्रात वाचले नाही काय? परंतु तरी ते निर्दोष असत.

मत्तय 12:6 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मी तुम्हास सांगतो की, परमेश्वराच्या भवनापेक्षा महान असा कोणीतरी येथे आहे.

मत्तय 12:7 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
पवित्र शास्त्र म्हणते, मला दया हवी आहे आणि यज्ञ पशू नको. याचा खरा अर्थ तुम्हास समजला असता तर तुम्ही या निर्दोष लोकांस दोष लावला नसता.

मत्तय 12:8 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
कारण मनुष्याचा पुत्र शब्बाथाचा धनी आहे.

मत्तय 12:9 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
नंतर येशूने ते ठिकाण सोडले व यहूद्यांच्या सभास्थानात तो गेला.

मत्तय 12:10 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
सभास्थानात हात वाळलेला एक मनुष्य होता. काही यहूद्यांनी येशूवर काही दोषारोप करता यावा या हेतूने त्यास विचारला, “शब्बाथ दिवशी रोग बरे करणे योग्य आहे काय?”

मत्तय 12:11 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
येशूने त्यांना उत्तर दिले, “जर तुमच्यापैकी एखाद्याकडे मेंढरू असले व शब्बाथ दिवशी ते खड्ड्यात पडले, तर तो त्यास वर काढणार नाही काय?

मत्तय 12:12 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तर मग मनुष्य मेंढरापेक्षा कितीतरी अधिक मौल्यवान आहे. म्हणून नियमशास्त्र लोकांस शब्बाथ दिवशी चांगले करण्याची मोकळीक देते.”

मत्तय 12:13 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मग येशू त्या वाळलेल्या हाताच्या मनुष्यास म्हणाला, “तुझा हात पुढे सरळ कर.” त्या मनुष्याने हात लांब केला व तो हात बरा झाला आणि दुसऱ्या हातासारखाच चांगला झाला.

मत्तय 12:14 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
नंतर परूश्यांनी बाहेर जाऊन त्यास कसे मारावे याविषयी मसलत केली.

मत्तय 12:15 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
परूशी काय करीत आहेत ते येशूला माहीत होते. म्हणून येशू तेथून गेला. पुष्कळ लोक येशूच्या मागे निघाले व त्याने जे कोणी रोगी होते, त्या सर्वांना बरे केले.

मत्तय 12:16 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
आणि त्याने त्यांना निक्षून सांगितले की, तो कोण आहे, हे इतरांना सांगू नका.

मत्तय 12:17 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
यशया संदेष्ट्याच्याद्वारे जे सांगितले गेले होते ते पूर्ण होण्यासाठी त्याने असे म्हटले.

मत्तय 12:18 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
“हा माझा सेवक, याला मी निवडले आहे. मी त्याजवर प्रीती करतो आणि त्याच्याविषयी माझा जीव संतुष्ट वाटतो. मी आपला आत्मा त्याच्यावर ठेवीन, आणि तो परराष्ट्रीय लोकांस योग्य न्यायाची घोषणा करील.

मत्तय 12:19 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तो वाद घालणार नाही किंवा ओरडणार नाही, रस्त्यावर लोक त्याचा आवाज ऐकणार नाहीत.

मत्तय 12:20 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
वाकलेला बोरू तो मोडणार नाही आणि मंदावलेली वात तो विझवणार नाही. न्याय विजयास होईपर्यंत तो असे करील.

मत्तय 12:21 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
परराष्ट्रीय लोक त्याच्यावर आशा ठेवतील. येशूचे सामर्थ्य देवाकडून आहे.”

मत्तय 12:22 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मग काही मनुष्यांनी एकाला येशूकडे आणले. तो मनुष्य आंधळा व मुका होता व त्याच्यामध्ये भूत होते. येशूने त्या मनुष्यास बरे केले व तो बोलू लागला व पाहू लागला.

मत्तय 12:23 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
सर्व लोक चकित झाले, ते म्हणाले, “हा दाविदाचा पुत्र असेल काय?”

मत्तय 12:24 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
परूश्यांनी लोकांस हे बोलताना ऐकले. परूशी म्हणाले, “भूते काढण्यासाठी येशू बालजबूलचे सामर्थ्य वापरतो आणि बालजबूल हा तर भूतांचा अधिपती आहे.”

मत्तय 12:25 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
परूशी कसला विचार करीत आहेत ते येशूला जाणवत होते. म्हणून येशू त्यांना म्हणाला, “आपसात लढणारी राज्ये नाश पावतात व फूट पडलेले शहर किंवा घर टिकत नाही.

मत्तय 12:26 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
आणि जर सैतानच सैतानला काढतो तर त्यांच्यात मतभेद आहे, त्यांच्यात फूट आहे मग त्याचे राज्य कसे टिकेल?

मत्तय 12:27 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
आणि मी जर बालजबूलाच्या सहाय्याने भूते काढतो तर तुमचे लोक कोणाच्या सामर्थ्याने भूते काढतात. म्हणून तुमचे स्वतःचे लोक तुमचा न्याय करतील.

मत्तय 12:28 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
परंतु मी जर देवाच्या आत्म्याच्या साहाय्याने भूते काढतो तर देवाचे राज्य तुमच्यावर आले आहे.

मत्तय 12:29 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
किंवा एखाद्या बलवान मनुष्याच्या घरात शिरून, त्याच्या घरातील सर्व वस्तूची चोरी जर कोणाला करायची असेल तर प्रथम त्या बलवान मनुष्यास तो बांधून टाकील व मग तो चोरी करील.

मत्तय 12:30 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
जो मनुष्य माझ्याबरोबर काम करीत नाही तो माझ्याविरुद्ध आहे आणि जो माझ्याबरोबर गोळा करत नाही तो उधळून टाकतो.

मत्तय 12:31 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
म्हणून मी तुम्हास सांगतो, मनुष्यांना ते करीत असलेल्या सर्व पापांची व वाईट बोलतील त्याबद्दलही क्षमा करण्यात येईल पण जर कोणी पवित्र आत्म्याविरूद्ध बोलेल, तर त्यास क्षमा करण्यात येणार नाही.

मत्तय 12:32 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
एखादा मनुष्य जर मनुष्याच्या पुत्राविरुद्ध काही बोलेल तर त्यास क्षमा करण्यात येईल पण जो कोणी पवित्र आत्म्याविरूद्ध बोलेल त्यास क्षमा होणार नाही. त्यास या युगातही क्षमा होणार नाही व येणाऱ्या युगातही होणार नाही.

मत्तय 12:33 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
झाड चांगले आणि त्याचे फळ चांगले असे म्हणा, अथवा झाड वाईट आणि त्याचे फळ वाईट असे म्हणा; कारण झाड त्याच्या फळावरून ओळखले जाते.

मत्तय 12:34 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
अहो सापाच्या पिल्लांनो, तुम्ही वाईट असता तुम्हास चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील? जे अंतःकरणात आहे तेच तोंडावाटे बाहेर पडते.

मत्तय 12:35 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
चांगला मनुष्य आपल्या चांगल्या भांडारातून चांगल्या गोष्टी काढतो आणि वाईट मनुष्य आपल्या वाईट भांडारातून वाईट गोष्टी काढतो.

मत्तय 12:36 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
आणखी मी तुम्हास सांगतो की. जो प्रत्येक व्यर्थ शब्द लोक बोलतील त्याचा हिशोब ते न्यायाच्या दिवशी देतील.

मत्तय 12:37 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
कारण तू आपल्या बोलण्यावरून न्यायी ठरशील आणि आपल्या बोलण्यावरूनच दोषी ठरशील.”

मत्तय 12:38 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
काही नियमशास्त्राचे शिक्षक व परूशी यांच्यापैकी काहीजणांनी येशूला म्हटले, “गुरुजी, तुमच्या हातून एखादे चिन्ह पहावे अशी आमची इच्छा आहे.”

मत्तय 12:39 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
येशूने उत्तर दिले, “जे लोक देवाशी अप्रामाणिक आहेत, पापी आहेत असे लोक पुराव्यासाठी चमत्कार पाहू इच्छितात. पण योना संदेष्ट्याशिवाय दुसरे चिन्ह तुम्हास मिळणार नाही.

मत्तय 12:40 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
कारण योना जसा तीन दिवस व तीन रात्री मोठ्या माशाच्या पोटात होता तसा मनुष्याचा पुत्र तीन दिवस व तीन रात्री पृथ्वीच्या पोटात राहील.

मत्तय 12:41 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
जेव्हा तुमच्या पिढीचा न्याय होईल, तेव्हा निनवे शहराचे लोक उभे राहतील, तुमच्याविरुध्द साक्ष देतील आणि तुम्हास दोष देतील कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चात्ताप केला आणि आता तर तुमच्यामध्ये योनापेक्षा महान असा कोणीएक येथे आहे.

मत्तय 12:42 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
न्यायाच्या दिवशी दक्षिणेकडील देशाची राणी या पिढीबरोबर उभी राहून हिला दोषी ठरवील कारण शलमोनाचे ज्ञान ऐकायला ती पृथ्वीच्या शेवटापासून आली आणि शलमोनापेक्षा महान असा कोणी येथे आहे.”

मत्तय 12:43 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
“जेव्हा अशुद्ध आत्मा मनुष्यास सोडून बाहेर निघून जातो तेव्हा तो पाणी नसलेल्या ठिकाणाहून विसावा शोधीत फिरतो पण तो त्यास मिळत नाही.

मत्तय 12:44 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तेव्हा तो म्हणतो, जेथून मी आलो त्या माझ्या घरात मी परत जाईन आणि जेव्हा तो परत येतो तेव्हा ते घर रिकामे असलेले तसेच स्वच्छ व नीटनेटके असे त्यास दिसते.

मत्तय 12:45 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
नंतर तो जाऊन आपल्यापेक्षा दुष्ट असे दुसरे सात आणखी आत्मे आपल्याबरोबर घेतो व ते आत शिरून त्यास झपाटतात व त्याच्यात राहतात. मग त्या मनुष्याची शेवटची स्थिति पहिल्यापेक्षा वाईट होते. तसेच आजच्या या पापी पिढीचे होईल.”

मत्तय 12:46 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मग तो लोकसमुदायाबरोबर बोलत असता, त्याची आई व त्याचे भाऊ त्याच्याशी बोलण्यासाठी बाहेर वाट पाहत उभे होते.

मत्तय 12:47 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तेव्हा कोणीतरी त्यास म्हणाले, “तुमची आई व भाऊ बाहेर उभे आहेत. ते तुमच्याशी बोलण्याची वाट पाहत आहेत.”

मत्तय 12:48 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
त्याच्याशी बोलणाऱ्याला त्याने उत्तर दिले, “कोण माझी आई? कोण माझा भाऊ?”

मत्तय 12:49 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मग तो आपल्या शिष्यांकडे हात करून म्हणाला, “पाहा, माझी आई व माझे भाऊ हे आहेत.

मत्तय 12:50 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
कारण माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेनुसार जे वागतात, तेच माझे भाऊ, बहीण आणि आई.”

Available Bible Translations

American Standard Version (ASV)
Matthew 12 (ASV) »
King James Version (KJV)
Matthew 12 (KJV) »
GOD’S WORD® (GW)
Matthew 12 (GW) »
Berean Bible (BSB)
Matthew 12 (BSB) »
World English Bible (WEB)
Matthew 12 (WEB) »
French Bible (LSG)
Matthieu 12 (LSG) »
German Bible (LUTH1912)
Matthäus 12 (LUTH1912) »
Punjabi Bible (PANIRV)
ਮੱਤੀ 12 (PANIRV) »
Bengali Bible (BENIRV)
মথি 12 (BENIRV) »
Gujarati Bible (GUJIRV)
માથ્થી 12 (GUJIRV) »
Arabic Bible (AVD)
مَتَّى 12 (AVD) »
Portuguese Bible (BSL)
Mateus 12 (BSL) »
Vietnamese Bible (VIE)
Ma-thi-ơ 12 (VIE) »
Spanish Bible (RVA)
Mateo 12 (RVA) »
Italian Bible (RIV)
Matteo 12 (RIV) »
Chinese Simplified (CUVS)
马 太 福 音 12 (CUVS) »
Chinese Traditional (CUVT)
馬 太 福 音 12 (CUVT) »
Albanian Bible (ALB)
Mateu 12 (ALB) »
Swedish Bible (SV1917)
Matteus 12 (SV1917) »
Russian Bible (RUSV)
Матфея 12 (RUSV) »
Ukrainian Bible (UKR)
Матвія 12 (UKR) »
Hungarian Bible (KAR)
Máté 12 (KAR) »
Bulgarian Bible (BULG)
Матей 12 (BULG) »
Norwegian Bible (NORSK)
Matteus 12 (NORSK) »

मत्तय (MARIRV) Chapter Selection

MARIRV Book Selection List