प्रेषितांचीं कृत्यें Chapter 12 MARIRV Bible Verse Images

प्रेषितांचीं कृत्यें 12 Bible Verse Pictures. Choose from a large collection of inspirational, motivational and encouraging Bible verses with pictures of nature. Download and share प्रेषितांचीं कृत्यें 12 inspirational Bible verse images. Bible verse pictures were created based on verses from the Indian Revised Version (IRV) - Marathi. IRV-Marathi Bible verse images were generated with permission from Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS).

Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.
Please remember to give attribution to Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. when using IRV-Marathi Bible Verse images. You can use CC-licensed materials as long as you follow the license conditions. One condition of all CC licenses is attribution.

Creative Commons License

Terms of Use: This work is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. It is attributed to Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS), and the Unified Scripture XML (USX) format version can be found on the Digital Bible Library website. All IRV-Marathi Bible verse images were generated with permission from Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS).

In addition, we would like to give very special thanks to eBible.org for making the Marathi Indian Revised Version Bible available in MySQL format.


प्रेषितांचीं कृत्यें 12:1 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
त्या वेळेच्या सुमारास हेरोद राजाने मंडळीतील काही जणांस छळावे म्हणून त्यांच्यावर हात टाकला.

प्रेषितांचीं कृत्यें 12:2 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
योहानाचा भाऊ याकोबा ह्याला त्याने तलवारीने जिवे मारले.

प्रेषितांचीं कृत्यें 12:3 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
हेरोदाने पाहिले की, यहूदी अधिकाऱ्यांना हे आवडले आहे, म्हणून त्याने पेत्रालासुद्धा अटक करण्याचे ठरवले, ते बेखमीर भाकरीचे दिवस होते.

प्रेषितांचीं कृत्यें 12:4 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
हेरोदाने पेत्राला अटक करून तुरुंगात टाकले, त्याच्या रखवालीकरिता त्यास शिपायांच्या चार चौकड्यांच्या स्वाधीन केले, वल्हांडण सण झाल्यावर पेत्राला लोकांसमोर आणण्याची योजना होती.

प्रेषितांचीं कृत्यें 12:5 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
म्हणून पेत्राला तुंरूगात ठेवण्यात आले, पण मंडळी सातत्याने पेत्रासाठी देवाकडे प्रार्थना करीत होती.

प्रेषितांचीं कृत्यें 12:6 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
पेत्र दोन शिपायांच्यामध्ये झोपला होता, त्यास दोन साखळ्यांनी बांधले होते, तुरुंगाच्या दाराजवळ आणखी काही शिपाई पहारा देत होते, ती रात्रीची वेळ होती व हेरोदाने असा विचार केला की, दुसऱ्या दिवशी पेत्राला लोकांसमोर आणावे.

प्रेषितांचीं कृत्यें 12:7 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तेव्हा पाहा, अचानक परमेश्वराचा दूत तेथे उभा राहिला, तुरुंगाच्या खोलीत एकदम प्रकाश पडला, देवदूताने पेत्राच्या कुशीला स्पर्श करून त्यास उठवले, देवदूत म्हणाला, “लवकर ऊठ!” तेव्हा पेत्राच्या हातातील साखळ्या गळून पडल्या.

प्रेषितांचीं कृत्यें 12:8 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
देवदूत पेत्राला म्हणाला, “कपडे घाल व तुझ्या वहाणा घाल,” मग पेत्राने कपडे घातले, मग देवदूत म्हणाला, “तुझा झगा अंगात घाल व माझ्यामागे ये.”

प्रेषितांचीं कृत्यें 12:9 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मग देवदूत बाहेर पडला व पेत्र त्याच्यामागे चालला, पेत्राला कळत नव्हते की, हे खरोखर काय करीत आहे, त्यास वाटले आपण दृष्टांत पाहत आहोत.

प्रेषितांचीं कृत्यें 12:10 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
पहिल्या व दुसऱ्या फेऱ्यातील पहारेकऱ्यांना ओलांडून पेत्र व देवदूत लोखंडी दाराजवळ येऊन पोहोचले, ते त्यांच्यासाठी आपोआप उघडले, पेत्र व देवदूत दरवाजामधून बाहेर पडले, त्यांनी एक रस्ता पार केला आणि अचानक देवदूत पेत्राला सोडून निघून गेला.

प्रेषितांचीं कृत्यें 12:11 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
पेत्राला मग कळले की नक्की काय घडले आणि तो म्हणाला, “आता मला समजले की प्रभूने खरोखर त्याचा दूत माझ्याकडे पाठविला व त्याने मला हेरोदाच्या हातातून व यहूदी लोकांचा संपूर्ण अपेक्षाभंग करून मला सोडवले आहे.”

प्रेषितांचीं कृत्यें 12:12 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
या गोष्टींची जाणीव झाल्यावर पेत्र मरीयेच्या घरी गेला, ती योहान ज्याला मार्कही म्हणत त्याची आई होती, पुष्कळ लोक त्याठिकाणी जमले होते, ते सर्व प्रार्थना करीत होते.

प्रेषितांचीं कृत्यें 12:13 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
पेत्राने फाटकाचा दरवाजा ठोठावला, तेव्हा रुदा नावाची दासी फाटक उघडण्यासाठी आली.

प्रेषितांचीं कृत्यें 12:14 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तिने पेत्राचा आवाज लगेच ओळखला आणि ती खूप आनंदित झाली, ती फाटक उघडण्याचेसुद्धा विसरून गेली, ती आतमध्ये पळाली आणि लोकांस तिने सांगितले, “पेत्र दाराजवळ उभा आहे.”

प्रेषितांचीं कृत्यें 12:15 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
विश्वास ठेवणारे रुदाला म्हणाले, “तुला वेड लागले आहे!” परंतु पेत्र दाराजवळ उभा आहे, असे रुदा परत परत अगदी कळकळीने सांगू लागली, म्हणून लोक म्हणाले, “तो पेत्राचा दूत असला पाहिजे.”

प्रेषितांचीं कृत्यें 12:16 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
पण पेत्र बाहेरून फाटक सारखे ठोठावत होता, जेव्हा विश्वास ठेवणाऱ्यांनी फाटक उघडले, तेव्हा त्यांनी पेत्राला पाहिले, ते चकित झाले होते.

प्रेषितांचीं कृत्यें 12:17 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
पेत्राने हाताने खुणावून शांत राहायला सांगितले, मग त्याने प्रभूने तुरुंगातून कसे आणले हे सविस्तर सांगितले, तो म्हणाला, “याकोब व इतर बांधवांना काय घडले ते सांगा,” मग पेत्र तेथून निघून दुसऱ्या ठिकाणी गेला.

प्रेषितांचीं कृत्यें 12:18 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
दुसऱ्या दिवाशी शिपाई फार हताश झाले होते, पेत्राचे काय झाले असावे याचा ते विचार करीत होते.

प्रेषितांचीं कृत्यें 12:19 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
हेरोदाने पेत्राला सगळीकडे शोधले पण तो त्यास शोधू शकला नाही, मग हेरोदाने पहारेकऱ्यांना प्रश्न विचारले व त्यांना मरणाची शिक्षा ठोठावली, नंतर हेरोद यहूदीया प्रांतातून निघून गेला, तो कैसरीया शहरात गेला व तेथे काही काळ राहिला.

प्रेषितांचीं कृत्यें 12:20 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
हेरोद सोर व सिदोन नगरातील लोकांवर फार रागावला होता, ते लोक मिळून हेरोदाला भेटायला आले, ब्लस्तला आपल्या बाजूला वळविण्यात ते यशस्वी झाले, ब्लस्त हा राजाचा खाजगी सेवक होता, लोकांनी हेरोदाकडे शांततेची मागणी केली कारण त्यांचा देश अन्नधान्याच्या बाबतीत हेरोदाच्या देशावर अवलंबून होता.

प्रेषितांचीं कृत्यें 12:21 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
हेरोदाने त्यांना भेटण्यासाठी एक दिवस ठरवला, त्यादिवशी हेरोदाने आपला सुंदर दरबारी पोशाख घातला होता, तो न्यायासनावर बसून लोकांसमोर भाषण करू लागला.

प्रेषितांचीं कृत्यें 12:22 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
लोक मोठ्याने आरोळी करून म्हणाले, “ही तर देवाची वाणी आहे, मनुष्याची नव्हे!” हेरोदाने या स्तुतीचा स्वीकार केला.

प्रेषितांचीं कृत्यें 12:23 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
आणि त्याने देवाला गौरव दिला नाही, म्हणून परमेश्वराच्या दूताने त्यावर प्रहार केला, तो किडे पडून मरण पावला.

प्रेषितांचीं कृत्यें 12:24 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
देवाचे वचन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पसरत गेले व लोकांस प्रेरित करीत होता, विश्वास ठेवणाऱ्यांचा गट दिवसेंदिवस मोठा होत होता.

प्रेषितांचीं कृत्यें 12:25 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
बर्णबा व शौलाने त्यांचे यरूशलेम शहरातील काम संपविल्यानंतर ते अंत्युखियाला परत आले, त्यांनी मार्क योहान याला त्यांच्याबरोबर घेतले.

Available Bible Translations

American Standard Version (ASV)
Acts 12 (ASV) »
King James Version (KJV)
Acts 12 (KJV) »
GOD’S WORD® (GW)
Acts 12 (GW) »
Berean Bible (BSB)
Acts 12 (BSB) »
World English Bible (WEB)
Acts 12 (WEB) »
French Bible (LSG)
Actes 12 (LSG) »
Portuguese Bible (BSL)
Atos 12 (BSL) »
Spanish Bible (RVA)
Hechos 12 (RVA) »
Italian Bible (RIV)
Atti 12 (RIV) »
Chinese Simplified (CUVS)
使 徒 行 传 12 (CUVS) »
Chinese Traditional (CUVT)
使 徒 行 傳 12 (CUVT) »
Russian Bible (RUSV)
Деяния 12 (RUSV) »
Ukrainian Bible (UKR)
Дії 12 (UKR) »
Hungarian Bible (KAR)
Apostolok 12 (KAR) »
Bulgarian Bible (BULG)
Деяния 12 (BULG) »
Japanese Bible (JPN)
使徒行伝 12 (JPN) »

प्रेषितांचीं कृत्यें (MARIRV) Chapter Selection

MARIRV Book Selection List