प्रेषितांचीं कृत्यें Chapter 23 MARIRV Bible Verse Images

प्रेषितांचीं कृत्यें 23 Bible Verse Pictures. Choose from a large collection of inspirational, motivational and encouraging Bible verses with pictures of nature. Download and share प्रेषितांचीं कृत्यें 23 inspirational Bible verse images. Bible verse pictures were created based on verses from the Indian Revised Version (IRV) - Marathi. IRV-Marathi Bible verse images were generated with permission from Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS).

Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.
Please remember to give attribution to Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. when using IRV-Marathi Bible Verse images. You can use CC-licensed materials as long as you follow the license conditions. One condition of all CC licenses is attribution.

Creative Commons License

Terms of Use: This work is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. It is attributed to Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS), and the Unified Scripture XML (USX) format version can be found on the Digital Bible Library website. All IRV-Marathi Bible verse images were generated with permission from Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS).

In addition, we would like to give very special thanks to eBible.org for making the Marathi Indian Revised Version Bible available in MySQL format.


प्रेषितांचीं कृत्यें 23:1 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मग पौल न्यायसभेकडे स्थिर दृष्टी करून म्हणाला, “बंधुजनहो, मी आजपर्यंत देवाबरोबर पूर्ण सद्भावाने वागत आलो आहे.”

प्रेषितांचीं कृत्यें 23:2 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तेव्हा महायाजक हनन्या ह्याने त्याच्याजवळ उभे राहणाऱ्यांस त्याच्या तोंडात मारण्याची आज्ञा केली.

प्रेषितांचीं कृत्यें 23:3 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तेव्हा पौल त्यास म्हणाला, “हे चुना लावलेल्या भिंती, तुला देव मारील; तू नियमशास्त्राप्रमाणे माझा न्याय करावयाला बसला असता नियमशास्त्राविरुद्ध मला मारण्याची आज्ञा देतोस काय?”

प्रेषितांचीं कृत्यें 23:4 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तेव्हा जवळ उभे राहणारे म्हणाले, “तू देवाच्या महायाजकाची निंदा करितोस काय?”

प्रेषितांचीं कृत्यें 23:5 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
पौलाने म्हटले, “बंधुजनहो, हा महायाजक आहे हे मला ठाऊक नव्हते; कारण तू आपल्या लोकांच्या अधिकाऱ्याविरुद्ध वाईट बोलू नको असे शास्त्रात लिहिले आहे.”

प्रेषितांचीं कृत्यें 23:6 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तेव्हा त्यांच्यामध्ये एक भाग सदूकी व एक भाग परूशी आहे, हे ओळखून पौल न्यायसभेमध्ये मोठ्याने म्हणाला, “बंधुजनहो, मी परूशी व परुश्यांचा पुत्र आहे; आमची आशा व मरण पावलेल्यांचे पुनरुत्थान ह्यासंबंधाने माझी चौकशी होत आहे.”

प्रेषितांचीं कृत्यें 23:7 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तो हे बोलत आहे तोंच परूशी व सदूकी ह्यांच्यात भांडण लागून लोकात फुट पडली.

प्रेषितांचीं कृत्यें 23:8 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
कारण पुनरुत्थान नाही आणि देवदूत व आत्माही नाही, असे सदूकी म्हणतात; परूशी तर या दोन्ही गोष्टी मान्य करतात.

प्रेषितांचीं कृत्यें 23:9 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तेव्हा मोठी गडबड उडाली; आणि जे नियमशास्त्र शिक्षक, परूश्यांच्या पक्षाचे होते त्यांच्यातून काहीजण उठून तणतण करीत म्हणाले, “या मनुष्याच्या ठायी आम्हास काही वाईट दिसत नाही; जर आत्मा किंवा देवदूत त्यांच्याबरोबर बोलला असेल तर मग कसे?”

प्रेषितांचीं कृत्यें 23:10 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
असे त्यांच्यात जोराचे भांडण चालले असता; ते पौलाला फाडून टाकतील असे भय वाटून सरदाराने शिपायांना हुकुम केला की, खाली जाऊन त्यास त्यांच्यामधून सोडवून गढीत आणावे.

प्रेषितांचीं कृत्यें 23:11 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
त्याच रात्री प्रभू त्याच्यापुढे उभा राहून म्हणाला, “धीर धर; जशी तू यरूशलेमे शहरात माझ्याविषयी साक्ष दिली तशी रोम शहरांतही तुला द्यावी लागेल.”

प्रेषितांचीं कृत्यें 23:12 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मग दिवस उगवल्यावर, कित्येक यहूदी एकजूट करून शपथबद्ध होऊन म्हणाले, पौलाचा जीव घेईपर्यंत आम्ही खाणार पिणार नाही.

प्रेषितांचीं कृत्यें 23:13 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
हा कट रचणारे इसम चाळीसांहून अधिक होते.

प्रेषितांचीं कृत्यें 23:14 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
ते मुख्य याजक लोक व वडील ह्यांच्याकडे येऊन म्हणाले, “पौलाचा जीव घेईपर्यंत आम्ही अन्नाला शिवणार नाही, अशा कडकडीत शपथेने आम्ही आपणास बद्ध करून घेतले आहे.

प्रेषितांचीं कृत्यें 23:15 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तर आता त्याच्याविषयी आणखी काही बारकाईने विचारपूस करावयाची आहे, या निमित्ताने त्यास आपणाकडे आणावे असे तुम्ही न्यायसभेतही सरदाराला समजवावे; म्हणजे तो जवळ येतो न येतो तोंच त्याचा जीव घेण्यास आम्ही तयार आहोत.”

प्रेषितांचीं कृत्यें 23:16 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तेव्हा ते दबा धरून बसल्याचे पौलाच्या बहिणीच्या मुलाने ऐकले आणि गढीत जाऊन त्याने पौलाला सांगितले.

प्रेषितांचीं कृत्यें 23:17 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तेव्हा पौलाने एका शताधीपतीला बोलावून म्हटले, या तरुणाला सरदाराकडे घेऊन जा, ह्याला त्यास काही सांगावयाचे आहे.

प्रेषितांचीं कृत्यें 23:18 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तेव्हा त्याने त्यास सरदाराकडे नेऊन म्हटले, बंदिवान पौल ह्याने मला बोलावून विनंती केली की, या तरूणाला आपणाकडे आणावे, त्यास आपणाबरोबर काही बोलावयाचे आहे.

प्रेषितांचीं कृत्यें 23:19 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तेव्हा सरदाराने त्याचा हात धरून त्यास एकीकडे नेऊन विचारले, “तुला काय सांगावयाचे आहे?”

प्रेषितांचीं कृत्यें 23:20 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तो म्हणाला, “यहूद्यांनी असा एकोपा केला आहे की, पौलाविषयी आणखी काही बारकाईने विचारपूस करावयाच्या निमित्ताने त्यास उद्या खाली सभेमध्ये आणावे, अशी आपणाला विनंती करावी.

प्रेषितांचीं कृत्यें 23:21 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तर आपण त्यांचे ऐकू नका; कारण त्यांच्यापैकी चाळीसांहून अधिक माणसे त्याच्यासाठी दबा धरून बसली आहेत; त्यांनी शपथ घेतली आहे की, त्यास जिवे मारीपर्यंत आपण खाणार पिणार नाही; आणि आता ते तयार होऊन आपल्या संमतीची वाट पाहत आहे.”

प्रेषितांचीं कृत्यें 23:22 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तेव्हा, “तू हे मला कळविले आहे हे कोणाला सांगू नको, असे त्या तरूणाला निक्षून सांगून सरदाराने त्यास निरोप दिला.”

प्रेषितांचीं कृत्यें 23:23 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मग त्याने दोघा शताधिपतींना बोलावून सांगितले, “कैसरीयास जाण्यासाठी दोनशे शिपाई, सत्तर स्वार व दोनशे भालेकरी प्रहर रात्रीस तयार ठेवा.”

प्रेषितांचीं कृत्यें 23:24 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
आणि पाठाळे मिळवा, त्यावर पौलाला बसवून फेलिक्स सूभेदाराकडे सांभाळून न्या.

प्रेषितांचीं कृत्यें 23:25 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
शिवाय त्याने अशा मजकूराचे पत्र लिहिले.

प्रेषितांचीं कृत्यें 23:26 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
“महाराज फेलिक्स ह्यांना सुभेदार क्लौद्य लुसिया याचा सलाम.

प्रेषितांचीं कृत्यें 23:27 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
या मनुष्यास यहूद्यांनी धरले होते आणि त्यांच्याकडून त्याचा घात होणार होता, इतक्यात हा रोमी आहे असे कळाल्यावरून मी शिपाई घेऊन जाऊन त्यास सोडवले.

प्रेषितांचीं कृत्यें 23:28 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
आणि ह्याच्यावर आरोप आणण्याचे काय कारण होते हे समजून घेण्याच्या इच्छेने त्यास त्यांच्या न्यायसभेत खाली नेले.

प्रेषितांचीं कृत्यें 23:29 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तेव्हा त्यांच्या नियमशास्त्रातील वादग्रस्त गोष्टींसंबंधी त्याच्यावर काही ठपका आणला होता, परंतु मरणाची किंवा बंधनाची शिक्षा देण्याजोगा आरोप त्याच्यावर नव्हता, असे मला दिसून आले.

प्रेषितांचीं कृत्यें 23:30 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
या मनुष्या विरुद्ध कट होणार आहे अशी मला खबर लागताच मी त्यास आपल्याकडे पाठवले आहे, वादींनाही आपल्यासमोर खटला चालवण्यास सांगितले आहे, सुखरूप असावे.”

प्रेषितांचीं कृत्यें 23:31 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
शिपायांनी हुकुमाप्रमाणे पौलाला रात्री अंतिपत्रिसास नेले.

प्रेषितांचीं कृत्यें 23:32 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
आणि दुसऱ्या दिवशी त्याच्याबरोबर जाण्यास स्वार ठेवून ते गढीत परत आले.

प्रेषितांचीं कृत्यें 23:33 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
कैसरीयात गेल्यावर स्वारांनी सुभेदाराला पत्र देऊन पौलाला त्याच्यापुढे उभे केले.

प्रेषितांचीं कृत्यें 23:34 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
पत्र वाचून त्याने विचारले, हा कोणत्या प्रांताचा आहे; तो किलीकीयाचा आहे समजल्यावर,

प्रेषितांचीं कृत्यें 23:35 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
त्याने म्हटले, “तुझे वादी आले म्हणजे मी तुझे म्हणणे ऐकेन.” आणि ‘त्याला हेरोदाच्या राजवाड्यात ठेवावे’ असा त्याने हुकुम सोडला.

Available Bible Translations

American Standard Version
Acts 23 (ASV) »
King James Version
Acts 23 (KJV) »
GOD’S WORD® (GW)
Acts 23 (GW) »
Berean Bible
Acts 23 (BSB) »
World English Bible
Acts 23 (WEB) »
Louis Segond 1910
Actes 23 (LSG) »
इंडियन रिवाइज्ड वर्जन - हिंदी
प्रेरितों के काम 23 (HINIRV) »
ਭਾਰਤੀ ਸੋਧਿਆ ਹੋਇਆ ਸੰਸਕਰਣ - ਪੰਜਾਬੀ
ਰਸੂਲਾਂ ਦੇ ਕਰਤੱਬ 23 (PANIRV) »
ভারতীয় সংশোধিত সংস্করণ - বাংলা
पশিষ্যচরিত 23 (BENIRV) »
இந்தியன் ரீவைஸ்டு வேர்ஷன் - தமிழ்
அப்போஸ்தலருடைய நடபடிகள் 23 (TAMIRV) »
ఇండియన్ రేవిజ్డ్ వెర్షన్ - తెలుగు
అపొస్తలుల కార్యములు 23 (TELIRV) »
ઇન્ડિયન રિવાયઝ્ડ વર્ઝન - ગુજરાતી
પ્રેરિતોનાં ક્રત્યો 23 (GUJIRV) »
ಭಾರತೀಯ ಪರಿಷ್ಕೃತ ಆವೃತ್ತಿ - ಕನ್ನಡ
ಅಪೊಸ್ತಲರ ಕೃತ್ಯಗಳು 23 (KANIRV) »
الكتاب المقدس باللغة العربية، فان دايك
أَعْمَالُ ٱلرُّسُلِ 23 (AVD) »
תנ ך עברי מודרני
מעשי השליחים 23 (HEB) »
Bíblia Sagrada Português
Atos 23 (BSL) »
Kinh Thánh: Tiếng Việt
Công Vụ Các Sứ đồ 23 (VIE) »
Reina Valera Antigua
Hechos 23 (RVA) »
La Sacra Bibbia
Atti 23 (RIV) »
圣 经 简体中文和合本
使 徒 行 传 23 (CUVS) »
聖 經 繁體中文和合本
使 徒 行 傳 23 (CUVT) »
Библия на русском
Деяния 23 (RUSV) »
Українська Біблія
Дії 23 (UKR) »
Szent Biblia - Magyar
Apostolok 23 (KAR) »
Българска Библия
Деяния 23 (BULG) »
De Heilige Schrift
Handelingen 23 (NLD) »

प्रेषितांचीं कृत्यें (MARIRV) Chapter Selection

MARIRV Book Selection List