प्रेषितांचीं कृत्यें Chapter 14 MARIRV Bible Verse Images

प्रेषितांचीं कृत्यें 14 Bible Verse Pictures. Choose from a large collection of inspirational, motivational and encouraging Bible verses with pictures of nature. Download and share प्रेषितांचीं कृत्यें 14 inspirational Bible verse images. Bible verse pictures were created based on verses from the Indian Revised Version (IRV) - Marathi. IRV-Marathi Bible verse images were generated with permission from Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS).

Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.
Please remember to give attribution to Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. when using IRV-Marathi Bible Verse images. You can use CC-licensed materials as long as you follow the license conditions. One condition of all CC licenses is attribution.

Creative Commons License

Terms of Use: This work is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. It is attributed to Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS), and the Unified Scripture XML (USX) format version can be found on the Digital Bible Library website. All IRV-Marathi Bible verse images were generated with permission from Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS).

In addition, we would like to give very special thanks to eBible.org for making the Marathi Indian Revised Version Bible available in MySQL format.


प्रेषितांचीं कृत्यें 14:1 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
पौल व बर्णबा इकुन्या शहरात गेले, ते तेथील यहूदी सभास्थानात गेले, तेथील लोकांशी ते बोलले, पौल व बर्णबा अशा रीतीने बोलले की, पुष्कळ यहूदी लोकांनी व ग्रीक लोकांनी त्यांनी जे सांगितले त्यावर विश्वास ठेवला.

प्रेषितांचीं कृत्यें 14:2 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
परंतु काही यहूदी लोकांनी विश्वास ठेवला नाही, त्यांनी परराष्ट्रीय लोकांची मने भडकाविली आणि बंधुजनांविषयीची मने वाईट केली.

प्रेषितांचीं कृत्यें 14:3 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
म्हणून पौल व बर्णबाने त्याठिकाणी बरेच दिवस मुक्काम केला आणि परमेश्वराच्या बलाने येशूविषयी धैर्याने सांगत राहीले, पौल व बर्णबाने देवाच्या कृपेविषयी साक्ष दिला, परमेश्वराने त्यांना पौल व बर्णबाला चमत्कार व अद्भूते कृत्ये करण्यास मदत करून ते जे काही सांगत होते ते खरे ठरवले.

प्रेषितांचीं कृत्यें 14:4 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
परंतु शहरातील काही लोकांस यहूदी लोकांची मते पटली, दुसऱ्या लोकांस प्रेषित पौल व बर्णबाचे म्हणणे पटले, त्यामुळे शहरात दोन तट पडले.

प्रेषितांचीं कृत्यें 14:5 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
काही परराष्ट्रीय लोक, काही यहूदी लोक व त्यांचे पुढारी यांनी पौल व बर्णबाला बांधले व इजा करण्याचा प्रयत्न केला, त्यांना पौल व बर्णबा यांना दगडमार करून मारावयाचे होते.

प्रेषितांचीं कृत्यें 14:6 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
पौल व बर्णबा यांना जेव्हा त्याविषयी कळले तेव्हा त्यांनी ते शहर सोडले, ते लुस्र व दर्बे या लुकवनिया देशाच्या नगरात गेले आणि त्या शहरांच्या सभोवतालच्या परिसरात गेले.

प्रेषितांचीं कृत्यें 14:7 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
आणि तेथे त्यांनी सुवार्ता सांगितली.

प्रेषितांचीं कृत्यें 14:8 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
लुस्र येथे एक मनुष्य होता त्याचे पाय अधू होते तो जन्मतःच पांगळा जन्मला होता व कधीच चालला नव्हता.

प्रेषितांचीं कृत्यें 14:9 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
पौल भाषण करीत असताना हा मनुष्य ऐकत होता, पौलाने त्याच्याकडे दृष्टी लावून व त्यास आपण बरे होऊ असा त्या मनुष्याचा विश्वास आहे असे पाहून.

प्रेषितांचीं कृत्यें 14:10 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मोठ्याने म्हणाला, “तुझ्या पायांवर नीट उभा राहा!” तेव्हा त्या मनुष्याने उडी मारली आणि चालू लागला.

प्रेषितांचीं कृत्यें 14:11 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
पौलाने केलेले लोकांनी जेव्हा पाहिले, तेव्हा ते आपल्या लुकवनिया भाषेत ओरडले, ते म्हणाल, “देव मनुष्यांच्या रूपाने आमच्यात उतरले आहेत.”

प्रेषितांचीं कृत्यें 14:12 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
लोकांनी बर्णबाला ज्यूपितर म्हटले व पौलाला मर्क्युरी म्हटले, कारण पौल मुख्य बोलणारा होता.

प्रेषितांचीं कृत्यें 14:13 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
ज्यूपितरचे मंदिर जवळ होते, या मंदिराचा पुजारी काही बैल व फुले घेऊन वेशीजवळ आला, पुजारी व लोकांस पौल व बर्णबा यांची उपासाना करण्यासाठी त्यांच्यापुढे बळी द्यावयाचा होता.

प्रेषितांचीं कृत्यें 14:14 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
परंतु ते काय करीत आहेत, हे जेव्हा प्रेषित पौल व बर्णबा यांना समजले तेव्हा त्यांनी आपले कपडे फाडले व लोकांच्या गर्दीत शिरले आणि मोठ्याने म्हणाले.

प्रेषितांचीं कृत्यें 14:15 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
लोकांनो, या गोष्टी तुम्ही का करीत आहात? आम्ही देव नाही! तुम्हास जशा भावना आहेत, तशाच आम्हासही आहेत! आम्ही तुम्हास सुवार्ता सांगायला आलो, आम्ही तुम्हास हे सांगत आहोत की या व्यर्थ गोष्टींपासून तुम्ही तुमचे मन वळवावे, खऱ्या जिवंत देवाकडे आपले मन लावावे, त्यानेच आकाश, पृथ्वी, समुद्र व जे काही आहे ते निर्माण केले.

प्रेषितांचीं कृत्यें 14:16 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
भूतकाळात, देवाने सर्व राष्ट्रांना त्यांना जसे पाहिजे तसे वागू दिले.

प्रेषितांचीं कृत्यें 14:17 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
परंतु देवाने अशा गोष्टी केल्या, की त्याद्वारे तो खरा आहे हे सिद्ध व्हावे, तो तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी करतो, तो तुम्हास आकाशातून पाऊस देतो, योग्यवेळी तो तुम्हास चांगले पीक देतो, तो तुम्हास भरपूर अन्न देतो व तो तुमची अंतःकरणे आनंदाने भरतो.

प्रेषितांचीं कृत्यें 14:18 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
पौल व बर्णबाने या गोष्टी लोकांस सांगितल्या व मोठ्या प्रयासाने आपणास यज्ञ अर्पिण्यापासून त्याना परावृत्त केले.

प्रेषितांचीं कृत्यें 14:19 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
नंतर अंत्युखिया व इकुन्या येथील काही यहूदी लोक तेथे आले, त्यांनी लोकसमुदायाची मने आपल्या बाजूस वळविली आणि पौलाला दगडमार केला, त्यामध्ये पौल मरण पावला असे समजून त्यांनी त्यास ओढत नेऊन नगराबाहेर टाकले.

प्रेषितांचीं कृत्यें 14:20 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
पण शिष्य पौलाभोवती जमा झाल्यावर पौल उठून परत शहरात गेला व दुसऱ्या दिवशी बर्णबाबरोबर तो दर्बे शहरास गेले.

प्रेषितांचीं कृत्यें 14:21 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
आणि त्या नगरात त्यांनी सुवार्ता सांगून अनेक लोकांस शिष्य केले, त्यानंतर ते लुस्र, इकुन्या आणि अंत्युखिया नगरांना परत आले.

प्रेषितांचीं कृत्यें 14:22 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
आणि त्यांनी तेथील शिष्यांना येशूवरील विश्वासात बळकट केले, त्यांनी आपल्या विश्वासांत अढळ रहावे म्हणून उत्तेजन दिले, ते म्हणाले, “अनेक दुःखांना तोंड देत आपण देवाच्या राज्यात प्रवेश केला पाहिजे.”

प्रेषितांचीं कृत्यें 14:23 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
पौल व बर्णबाने प्रत्येक मंडळीत वडीलजनांची नेमणूक केली, त्यांनी या वडिलांसाठी उपवास आणि प्रार्थना केल्या, प्रभू येशूवर विश्वास असलेले असे सर्व वडीलजन होते म्हणून पौलाने व बर्णबाने त्यांना प्रभूच्या हाती सोपवले.

प्रेषितांचीं कृत्यें 14:24 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
पौल आणि बर्णबा पिसिदिया प्रदेशातून गेले नंतर ते पंफुलिया येथे आले.

प्रेषितांचीं कृत्यें 14:25 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
त्यांनी पिर्गा शहरात देवाचा संदेश दिला नंतर ते अत्तलिया शहरात गेले.

प्रेषितांचीं कृत्यें 14:26 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
नंतर तेथून पुढे पौल व बर्णबा सिरीया प्रांतातील अंत्युखियात समुद्रमार्गे गेले, जे काम त्यांनी पूर्ण केले होते त्याची सुरुवात त्यांनी देवाच्या कृपेने अंत्युखियापासूनच केली होती.

प्रेषितांचीं कृत्यें 14:27 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
ते जेव्हा तेथे पोहोचले, तेव्हा त्यांनी मंडळीला एकत्र बोलावले आणि देवाने त्यांच्याबाबतीत ज्या ज्या गोष्टी केल्या त्या त्यांना सांगितल्या तसेच दुसऱ्या देशातील परराष्ट्रीय लोकांमध्ये देवाने विश्वासाचे द्वार कसे उघडले ते सांगितले.

प्रेषितांचीं कृत्यें 14:28 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
नंतर ते विश्वास ठेवणाऱ्यांबरोबर तेथे बरेच दिवस राहिले.

Available Bible Translations

American Standard Version (ASV)
Acts 14 (ASV) »
King James Version (KJV)
Acts 14 (KJV) »
GOD’S WORD® (GW)
Acts 14 (GW) »
Berean Bible (BSB)
Acts 14 (BSB) »
World English Bible (WEB)
Acts 14 (WEB) »
French Bible (LSG)
Actes 14 (LSG) »
Portuguese Bible (BSL)
Atos 14 (BSL) »
Spanish Bible (RVA)
Hechos 14 (RVA) »
Italian Bible (RIV)
Atti 14 (RIV) »
Chinese Simplified (CUVS)
使 徒 行 传 14 (CUVS) »
Chinese Traditional (CUVT)
使 徒 行 傳 14 (CUVT) »
Russian Bible (RUSV)
Деяния 14 (RUSV) »
Ukrainian Bible (UKR)
Дії 14 (UKR) »
Hungarian Bible (KAR)
Apostolok 14 (KAR) »
Bulgarian Bible (BULG)
Деяния 14 (BULG) »
Japanese Bible (JPN)
使徒行伝 14 (JPN) »

प्रेषितांचीं कृत्यें (MARIRV) Chapter Selection

MARIRV Book Selection List