प्रेषितांचीं कृत्यें Chapter 15 MARIRV Bible Verse Images

प्रेषितांचीं कृत्यें 15 Bible Verse Pictures. Choose from a large collection of inspirational, motivational and encouraging Bible verses with pictures of nature. Download and share प्रेषितांचीं कृत्यें 15 inspirational Bible verse images. Bible verse pictures were created based on verses from the Indian Revised Version (IRV) - Marathi. IRV-Marathi Bible verse images were generated with permission from Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS).

Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.
Please remember to give attribution to Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. when using IRV-Marathi Bible Verse images. You can use CC-licensed materials as long as you follow the license conditions. One condition of all CC licenses is attribution.

Creative Commons License

Terms of Use: This work is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. It is attributed to Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS), and the Unified Scripture XML (USX) format version can be found on the Digital Bible Library website. All IRV-Marathi Bible verse images were generated with permission from Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS).

In addition, we would like to give very special thanks to eBible.org for making the Marathi Indian Revised Version Bible available in MySQL format.


प्रेषितांचीं कृत्यें 15:1 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तेव्हा काही जणानी यहूदीयाहून उतरून बंधुजनांना अशी शिकवण दिली की, मोशेने लावून दिलेल्या नियमाप्रमाणे तुमची सुंता झाल्याशिवाय तुमचे तारण होणे शक्य नाही.

प्रेषितांचीं कृत्यें 15:2 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तेव्हा पौल व बर्णबा ह्यांचा त्यांच्याशी बराच मतभेद व वादविवाद झाल्यावर असे ठरविण्यात आले की, पौल व बर्णबा ह्यांनी व त्यांच्यापैकी इतर लोकांनी या वादाविषयी यरूशलेम शहरामधील प्रेषित व वडील ह्यांच्याकडे जावे.

प्रेषितांचीं कृत्यें 15:3 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मग मंडळीने त्यांना पाठवल्यावर ते फेनीके व शोमरोन या शहरामधून गेले आणि परराष्ट्रीय देवाकडे वळल्याचे सविस्तर वर्तमान सांगून त्यांनी सर्व बंधुजनांना फार आनंदित केले.

प्रेषितांचीं कृत्यें 15:4 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
नंतर ते यरूशलेम शहरास आल्यावर तेथील मंडळी, प्रेषित व वडील ह्यांनी त्यांचे आगतस्वागत केले, तेव्हा आपण देवाच्या सहवासांत असतांना त्याने जे जे केले ते त्यांनी सांगितले.

प्रेषितांचीं कृत्यें 15:5 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तरीही परूशी पंथातील कित्येक विश्वास ठेवणारे असे म्हणाले, त्यांची सुंता झालीच पाहिजे व मोशेचे नियमशास्त्र पाळावयाची त्यांना आज्ञा केलीच पाहीजे.

प्रेषितांचीं कृत्यें 15:6 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मग प्रेषित व वडीलवर्ग या प्रकरणाचा विचार करावयास जमले.

प्रेषितांचीं कृत्यें 15:7 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तेव्हा पुष्कळ वादविवाद झाल्यावर पेत्र उभा राहून त्यांना म्हणाला बंधुजनहो, तुम्हास ठाऊक आहे की, माझ्या तोडून सुवार्ता ऐकून परराष्ट्रीयांनी विश्वास ठेवावा म्हणून आरंभीचा दिवसांपासून तुम्हामध्ये देवाने माझी निवड केली.

प्रेषितांचीं कृत्यें 15:8 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
आणि हृदये जाणणाऱ्या देवाने जसा आपणास तसा त्यांनाही पवित्र आत्मा देऊन त्यांच्याविषयी साक्ष दिली.

प्रेषितांचीं कृत्यें 15:9 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
त्याने त्यांची अंतःकरणे विश्वासाने शुद्ध करून त्यांच्यामध्ये व आपल्यामध्ये काही भेद ठेवला नाही.

प्रेषितांचीं कृत्यें 15:10 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
असे असतांना जे जोखड आपले पूर्वज व आपण वाहावयास समर्थ नव्हतो ते शिष्यांच्या मानेवर घालू तुम्ही देवाची परीक्षा का पाहता?

प्रेषितांचीं कृत्यें 15:11 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तर मग त्यांच्याप्रमाणेच आपले तारण प्रभू येशूच्या कृपेने होईल असा आपला विश्वास आहे.

प्रेषितांचीं कृत्यें 15:12 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तेव्हा सर्व लोक गप्प राहीले आणि बर्णबा व पौल ह्यांनी आपल्या द्वारे देवाने परराष्ट्रीयामध्ये जी चिन्हे व अद्भूते केली त्यांचे केलेले वर्णन त्यांनी ऐकून घेतले.

प्रेषितांचीं कृत्यें 15:13 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मग त्यांचे भाषण संपल्यावर याकोब म्हणाला; बंधुजनहो, माझे ऐका.

प्रेषितांचीं कृत्यें 15:14 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
परराष्ट्रीयांतून आपल्या नावाकरिता काही लोक काढून घ्यावे म्हणून देवाने त्यांची भेट कशी घेतली, हे शिमोनाने सांगितले आहे; आणि ह्याच्याशी संदेष्ट्यांच्या उक्तीचाही मेळ बसतो, असा शास्त्रलेख आहे की,

प्रेषितांचीं कृत्यें 15:15 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
परराष्ट्रीयांतून आपल्या नावाकरिता काही लोक काढून घ्यावे म्हणून देवाने त्यांची भेट कशी घेतली, हे शिमोनाने सांगितले आहे; आणि ह्याच्याशी संदेष्ट्यांच्या उक्तीचाही मेळ बसतो, असा शास्त्रलेख आहे की,

प्रेषितांचीं कृत्यें 15:16 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
ह्यानंतर मी परत येईन व दावीदाचा पडलेला मंडप पुन्हा उभारीन; आणि त्याची भगदाडे बुजवून तो पुन्हा नीट करीन,

प्रेषितांचीं कृत्यें 15:17 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
ह्यासाठी की, शेष राहिलेल्या मनुष्यांनी व ज्या राष्ट्रांना माझे नाव देण्यात आले आहे त्या सर्वांनी प्रभूचा शोध करावा.

प्रेषितांचीं कृत्यें 15:18 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
हे जे त्यास युगादीपासून माहीत आहे ते करणारा प्रभू असे म्हणतो.

प्रेषितांचीं कृत्यें 15:19 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तेव्हा माझे तर मत असे आहे की, जे परराष्ट्रीयांतून देवाकडे वळतात त्यांना त्रास देऊ नये;

प्रेषितांचीं कृत्यें 15:20 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तर त्यांना असे लिहून पाठवावे की, मूर्तीचे अमगंळपण, जारकर्म, गळा दाबून मारलेले प्राणी व रक्त ह्याच्यापासून तुम्ही अलिप्त असा.

प्रेषितांचीं कृत्यें 15:21 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
कारण प्राचीन काळापासून प्रत्येक शब्बाथ दिवशी सभास्थानात मोशेचे पुस्तक वाचून दाखवून त्याची घोषणा करणारे लोक प्रत्येक नगरांत आहेत.

प्रेषितांचीं कृत्यें 15:22 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तेव्हा पौल व बर्णबा ह्यांच्याबरोबर आपणातून निवडलेली माणसे म्हणजे बंधुजनांतील प्रमुख बर्शब्बा म्हटलेला यहूदा व सीला ह्यांना अंत्युखियास पाठवले तर बरे होईल असे सर्व मंडळीसह प्रेषित आणि वडील ह्यांना वाटले.

प्रेषितांचीं कृत्यें 15:23 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
त्यांच्या हाती त्यांनी असे लिहून पाठवलेः “अंत्युखिया, सिरीया व किलकिया येथील परराष्ट्रीयांतले बंधुजन ह्यांना प्रेषित व वडीलवर्ग या बंधुजनांचा सलाम.

प्रेषितांचीं कृत्यें 15:24 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
आमच्यापैकी काहींना जाऊन आपल्या बोलण्याने तुमचे जीव घोटाळ्यात पाडून त्रास दिला असे आमच्या कानी आले आहे; पण त्यांना आम्ही तसे करावयाला सांगितले नव्हते.

प्रेषितांचीं कृत्यें 15:25 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
म्हणून आमचे एकमत झाल्यावर आम्हास हे योग्य वाटले की,

प्रेषितांचीं कृत्यें 15:26 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाकरिता जीवावर उदार झालेले आपले प्रिय बंधू बर्णबा व पौल ह्यांच्याबरोबर काही निवडलेले माणसे तुम्हाकडे पाठवावी.

प्रेषितांचीं कृत्यें 15:27 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
ह्याकरिता यहूदा व सीला ह्यांना आम्ही पाठवले आहे ते स्वतः या गोष्टी तुम्हास तोंडी सांगतील.

प्रेषितांचीं कृत्यें 15:28 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
कारण पुढे दिलेल्या जरुरीच्या गोष्टीशिवाय तुम्हावर जास्त ओझे लादू नये असे पवित्र आत्म्याला व आम्हास योग्य वाटले:

प्रेषितांचीं कृत्यें 15:29 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
त्या म्हणजे मूर्तीला अर्पिलेले पदार्थ, रक्त, गळा दाबून मारलेले प्राणी व जारकर्म ही तुम्ही वर्ज्य करावी; ह्यापासून स्वतःला जपाल तर तुमचे हित होईल, क्षेमकुशल असो.”

प्रेषितांचीं कृत्यें 15:30 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
त्यांना पाठवून दिल्यावर ते अंत्युखियास गेले आणि त्यांनी सर्व मंडळीला जमवून ते पत्र सादर केले.

प्रेषितांचीं कृत्यें 15:31 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
त्यातला बोध वाचून त्यांना आनंद झाला.

प्रेषितांचीं कृत्यें 15:32 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
यहूदा व सीला हे स्वतः संदेष्टे होते, म्हणून त्यांनी पुष्कळ बोलून बंधुजनांना बोध केला व स्थिरावले.

प्रेषितांचीं कृत्यें 15:33 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तेथे ते काही दिवस राहील्यावर ज्यांनी त्यांना पाठवले होते त्यांच्याकडे जाण्यास बंधुजनांनी त्यांना शांतीने पाठवून दिले.

प्रेषितांचीं कृत्यें 15:34 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
परंतु सिलाला तेथे आणखी रहावयास बरे वाटले.

प्रेषितांचीं कृत्यें 15:35 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
आणि पौल व बर्णबा इतर पुष्कळ जणांबरोबर प्रभूचे वचन शिकवीत व सुवार्तेची घोषणा करीत अंत्युखियास राहीले.

प्रेषितांचीं कृत्यें 15:36 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मग काही दिवसानंतर पौलाने बर्णबाला म्हणले “ज्या ज्या नगरात आपण प्रभूच्या वचनांची घोषणा केली तेथे पुन्हा जाऊन बंधुजनांना भेटून ते कसे आहेत हे पाहू या.”

प्रेषितांचीं कृत्यें 15:37 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
बर्णबाची इच्छा होती की, ज्याला मार्क म्हणत त्या योहानाला बरोबर घ्यावे.

प्रेषितांचीं कृत्यें 15:38 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
परंतु पौलाला वाटले की, पंफुलियाहून जो आपणाला सोडून गेला होता व आपल्याबरोबर काम करावयास आला नाही त्यास सोबतील घेणे योग्य नाही.

प्रेषितांचीं कृत्यें 15:39 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
ह्यावरून त्यांच्यामध्ये तीव्र मतभेद उपस्थित होऊन ते एकमेकांपासून वेगळे झाले आणि बर्णबा मार्काला घेऊन तारवात बसून कुप्रास गेला;

प्रेषितांचीं कृत्यें 15:40 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
पौलाने सीलाला निवडून घेतले आणि बंधुजनांनी त्यास प्रभूच्या कृपेवर सोपविल्यावर तो तेथून निघाला.

प्रेषितांचीं कृत्यें 15:41 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
आणि मंडळयाना स्थैर्य देत सिरीया व किलिकिया ह्यामधुन गेला.

Available Bible Translations

American Standard Version (ASV)
Acts 15 (ASV) »
King James Version (KJV)
Acts 15 (KJV) »
GOD’S WORD® (GW)
Acts 15 (GW) »
Berean Bible (BSB)
Acts 15 (BSB) »
World English Bible (WEB)
Acts 15 (WEB) »
French Bible (LSG)
Actes 15 (LSG) »
Portuguese Bible (BSL)
Atos 15 (BSL) »
Spanish Bible (RVA)
Hechos 15 (RVA) »
Italian Bible (RIV)
Atti 15 (RIV) »
Chinese Simplified (CUVS)
使 徒 行 传 15 (CUVS) »
Chinese Traditional (CUVT)
使 徒 行 傳 15 (CUVT) »
Russian Bible (RUSV)
Деяния 15 (RUSV) »
Ukrainian Bible (UKR)
Дії 15 (UKR) »
Hungarian Bible (KAR)
Apostolok 15 (KAR) »
Bulgarian Bible (BULG)
Деяния 15 (BULG) »
Japanese Bible (JPN)
使徒行伝 15 (JPN) »

प्रेषितांचीं कृत्यें (MARIRV) Chapter Selection

MARIRV Book Selection List