प्रेषितांचीं कृत्यें Chapter 18 MARIRV Bible Verse Images

प्रेषितांचीं कृत्यें 18 Bible Verse Pictures. Choose from a large collection of inspirational, motivational and encouraging Bible verses with pictures of nature. Download and share प्रेषितांचीं कृत्यें 18 inspirational Bible verse images. Bible verse pictures were created based on verses from the Indian Revised Version (IRV) - Marathi. IRV-Marathi Bible verse images were generated with permission from Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS).

Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.
Please remember to give attribution to Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. when using IRV-Marathi Bible Verse images. You can use CC-licensed materials as long as you follow the license conditions. One condition of all CC licenses is attribution.

Creative Commons License

Terms of Use: This work is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. It is attributed to Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS), and the Unified Scripture XML (USX) format version can be found on the Digital Bible Library website. All IRV-Marathi Bible verse images were generated with permission from Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS).

In addition, we would like to give very special thanks to eBible.org for making the Marathi Indian Revised Version Bible available in MySQL format.


प्रेषितांचीं कृत्यें 18:1 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
नंतर पौलाने अथेनै शहर सोडले व करिंथ शहरास गेला.

प्रेषितांचीं कृत्यें 18:2 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
करिंथमध्ये पौल एका यहूदी मनुष्यास भेटला ज्याचे नाव अक्विला असे होते, तो पंत प्रांतातील रहिवासी होता, आपली पत्नी प्रिस्किल्ला हिच्यासह नुकताच तो इटलीहून आला होता, कारण सर्व यहूदी लोकांनी रोम शहर सोडून गेले पाहिजे असा हुकूम क्लौद्याने काढला होता, पौल त्यांना भेटावयास गेला.

प्रेषितांचीं कृत्यें 18:3 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
पौलासारखेच ते तंबू बनवणारे होते, तो त्यांच्याबरोबर राहिला व त्यांच्याबरोबर काम करू लागला.

प्रेषितांचीं कृत्यें 18:4 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
प्रत्येक शब्बाथवारी पौल सभास्थानात यहूदी लोकांशी व ग्रीक लोकांशी बोलत असे, आणि तो यहूदी व ग्रीक लोकांची मने वळविण्याचा प्रयत्न करीत असे.

प्रेषितांचीं कृत्यें 18:5 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
जेव्हा सीला व तीमथ्य हे मासेदोनियाहून परत आले, तेव्हा पौल यहूदी लोकांस उपदेश करण्यात आपला सर्व वेळ घालवू लागला, येशू हाच ख्रिस्त आहे. अशी साक्ष देऊ लागला.

प्रेषितांचीं कृत्यें 18:6 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
परंतु यहूदी लोकांनी पौलाला विरोध केला, त्यास यहूदी लोक वाईट रीतीने बोलले, तेव्हा आपला निषेध दर्शविण्याकरिता पौलाने आपल्या अंगावरील कपडे झटकले, तो यहूदी लोकांस म्हणाला, “जर तुमचे तारण झाले नाही, तर तो तुमचा दोष असेल! तुमचे रक्त तुमच्याच माथी असो! मी निर्दोष आहे, येथून पुढे मी परराष्ट्रीय लोकांकडेच जाईन.”

प्रेषितांचीं कृत्यें 18:7 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
पौल तेथून निघाला आणि सभास्थानाजवळ राहत असलेल्या तीत युस्त नावाचा देवाचा उपासक याच्या घरी गेला.

प्रेषितांचीं कृत्यें 18:8 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
त्या सभास्थानाचा क्रिस्प हा पुढारी होता, क्रिस्पने व त्याच्या घरातील सर्वांनी प्रभूवर विश्वास ठेवला, करिंथ येथील पुष्कळ लोकांनी पौलाचे बोलणे ऐकले आणि विश्वास ठेवला, करिंथ येथील पुष्कळ लोकांनी पौलाचे बोलणे ऐकले आणि विश्वास ठेवला आणि त्यांचा बाप्तिस्मा करण्यात आला.

प्रेषितांचीं कृत्यें 18:9 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
एके रात्री, प्रभूने स्वप्नामध्ये पौलाला म्हटले, “घाबरु नको, बोलत राहा, शांत राहू नको.

प्रेषितांचीं कृत्यें 18:10 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मी तुझ्याबरोबर आहे, कोणीही तुझ्यावर हल्ला करणार नाही व तुला इजा करणार नाही; कारण या शहरात माझे पुष्कळ लोक आहेत.”

प्रेषितांचीं कृत्यें 18:11 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
म्हणून पौल तेथे दीड वर्षे देवाचे वचन त्या लोकांस शिकवीत राहिला.

प्रेषितांचीं कृत्यें 18:12 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
जेव्हा गल्लियो अखया प्रांताचा राज्यपाल होता, त्यावेळेस काही यहूदी पौलविरुद्ध एकत्र आले आणि त्यास न्यायासनापुढे उभे केले.

प्रेषितांचीं कृत्यें 18:13 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
यहूदी लोक म्हणाले, “हा मनुष्य अशा रीतीने लोकांस देवाची उपासना करायला शिकवीत आहे की, जे नियमशास्त्राच्या विरुद्ध आहे.”

प्रेषितांचीं कृत्यें 18:14 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
पौल काही बोलणार इतक्यात गल्लियो यहूदी लोकांस म्हणाला, “एखादा अपराध किंवा वाईट गोष्ट असती तर तुमचे म्हणणे ऐकून घेणे रास्त ठरले असते.

प्रेषितांचीं कृत्यें 18:15 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
परंतु ज्याअर्थी ही बाब शब्द, नावे व तुमच्या नियमशास्त्रातील प्रश्नांशी संबंधित आहे, त्याअर्थी तुम्हीच तुमची समस्या सोडवा, अशा गोष्टींबाबत न्याय करण्यास मी नकार देतो.”

प्रेषितांचीं कृत्यें 18:16 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मग गल्लियोने त्यांना न्यायासनापुढून घालवून दिले.

प्रेषितांचीं कृत्यें 18:17 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मग त्या सर्वांनी सभास्थानाचा प्रमुख सोस्थनेस याला न्यायासनासमोर मारहाण केली, पण गल्लियोने त्याकडे लक्ष दिले नाही.

प्रेषितांचीं कृत्यें 18:18 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
पौल बंधुजनांबरोबर बरेच दिवस राहिला, नंतर तो निघाला व सिरीया प्रांताला समुद्रमार्गे गेला आणि त्याच्याबरोबर प्रिस्किल्ला व अक्विला ही दोघे होती, पौलाने किंख्रिया शहरात आपल्या डोक्याचे मुंडण केले, कारण त्याने नवस केला होता.

प्रेषितांचीं कृत्यें 18:19 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मग ते इफिस येथे आले, पौलाने प्रिस्किल्ला व अक्विला यांना तेथे सोडले, तो सभास्थानात गेला आणि यहूदी लोकांबरोबर वादविवाद केला.

प्रेषितांचीं कृत्यें 18:20 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
जेव्हा त्यांनी त्यास तेथे आणखी काही वेळ थांबण्यासाठी सांगितले, तेव्हा तो कबूल झाला नाही.

प्रेषितांचीं कृत्यें 18:21 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
परंतु जाता जाता तो म्हणाला, “देवाची इच्छा असेल तर मी परत तुमच्याकडे येईन” मग तो समुद्रमार्गे इफिसहून निघाला.

प्रेषितांचीं कृत्यें 18:22 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
जेव्हा पौल कैसरीया येथे आला, तेव्हा तो तेथून वर यरूशलेम शहरास गेला आणि मंडळीला भेटला, मग तो खाली अंत्युखियाला गेला.

प्रेषितांचीं कृत्यें 18:23 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तेथे काही दिवस राहिल्यानंतर तो गेला आणि गलतिया व फ्रुगिया या प्रदेशातून ठिकठिकाणी प्रवास करीत गेला, त्याने येशूच्या अनुयायांना विश्वासात बळकट केले.

प्रेषितांचीं कृत्यें 18:24 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
अपुल्लो नावाचा एक यहूदी होता, तो आलेक्सांद्र शहरात जन्मला होता, तो उच्च शिक्षित होता, तो इफिस येथे आला, त्यास शास्त्रलेखाचे सखोल ज्ञान होते.

प्रेषितांचीं कृत्यें 18:25 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
परमेश्वराच्या मार्गाचे शिक्षण त्यास देण्यात आले होते, तो आत्म्यात आवेशी असल्यामुळे येशूविषयी अचूकतेने शिकवीत असे व बोलत असे, तरी त्यास फक्त योहानाचा बाप्तिस्माच ठाऊक होता.

प्रेषितांचीं कृत्यें 18:26 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तो सभास्थानात निर्भीडपणे बोलू लागला, तेव्हा प्रस्किला व अक्विला ह्यांनी त्यांचे भाषण ऐकूण त्यास जवळ बोलावून घेतले व त्यास देवाचा मार्ग अधिक स्पष्टपणे दाखविला.

प्रेषितांचीं कृत्यें 18:27 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
अपुल्लोला अखया देशाला जायचे होते, तेव्हा बंधुंनी त्यास उत्तेजन दिले आणि तेथील येशूच्या शिष्यांना त्याचे स्वागत करण्याविषयी लिहिले, जेव्हा तो पोहोंचला, तेव्हा ज्यांनी कृपेमुळे विश्वास ठेवला होता, त्यांना त्याने खूप मदत केली.

प्रेषितांचीं कृत्यें 18:28 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
जाहीर वादविवादात त्याने यहूदी लोकांस फार जोरदारपणे पराभूत केले आणि पवित्र शास्त्रलेखाच्या आधारे येशू हाच ख्रिस्त आहे हे सिद्ध केले.

Available Bible Translations

American Standard Version (ASV)
Acts 18 (ASV) »
King James Version (KJV)
Acts 18 (KJV) »
GOD’S WORD® (GW)
Acts 18 (GW) »
Berean Bible (BSB)
Acts 18 (BSB) »
World English Bible (WEB)
Acts 18 (WEB) »
French Bible (LSG)
Actes 18 (LSG) »
Portuguese Bible (BSL)
Atos 18 (BSL) »
Spanish Bible (RVA)
Hechos 18 (RVA) »
Italian Bible (RIV)
Atti 18 (RIV) »
Chinese Simplified (CUVS)
使 徒 行 传 18 (CUVS) »
Chinese Traditional (CUVT)
使 徒 行 傳 18 (CUVT) »
Russian Bible (RUSV)
Деяния 18 (RUSV) »
Ukrainian Bible (UKR)
Дії 18 (UKR) »
Hungarian Bible (KAR)
Apostolok 18 (KAR) »
Bulgarian Bible (BULG)
Деяния 18 (BULG) »
Japanese Bible (JPN)
使徒行伝 18 (JPN) »

प्रेषितांचीं कृत्यें (MARIRV) Chapter Selection

MARIRV Book Selection List