प्रेषितांचीं कृत्यें Chapter 19 MARIRV Bible Verse Images

प्रेषितांचीं कृत्यें 19 Bible Verse Pictures. Choose from a large collection of inspirational, motivational and encouraging Bible verses with pictures of nature. Download and share प्रेषितांचीं कृत्यें 19 inspirational Bible verse images. Bible verse pictures were created based on verses from the Indian Revised Version (IRV) - Marathi. IRV-Marathi Bible verse images were generated with permission from Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS).

Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.
Please remember to give attribution to Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. when using IRV-Marathi Bible Verse images. You can use CC-licensed materials as long as you follow the license conditions. One condition of all CC licenses is attribution.

Creative Commons License

Terms of Use: This work is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. It is attributed to Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS), and the Unified Scripture XML (USX) format version can be found on the Digital Bible Library website. All IRV-Marathi Bible verse images were generated with permission from Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. (BCS).

In addition, we would like to give very special thanks to eBible.org for making the Marathi Indian Revised Version Bible available in MySQL format.


प्रेषितांचीं कृत्यें 19:1 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तेव्हा असे झाले की, अपुल्लो करिंथ येथे असताना पौल निरनिराळ्या भागातून प्रवास करीत इफिस येथे आला, तेथे त्यास काही शिष्य आढळले.

प्रेषितांचीं कृत्यें 19:2 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
पौलाने त्यांना विचारले, “जेव्हा तुम्ही विश्वास ठेवला, तेव्हा तुम्हास पवित्र आत्मा मिळाला काय?” ते अनुयायी त्यास म्हणाले, “पवित्र आत्मा आहे हे सुद्धा आम्ही ऐकलेले नाही.”

प्रेषितांचीं कृत्यें 19:3 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तो म्हणाला, “मग कसला बाप्तिस्मा तुम्ही घेतला?” ते म्हणाले, “योहानाचा बाप्तिस्मा.”

प्रेषितांचीं कृत्यें 19:4 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
पौल म्हणाला, “योहानाचा बाप्तिस्मा पश्चात्तापाचा होता, त्याने लोकांस सांगितले की, त्यानंतर जो येत आहे, त्याच्यावर लोकांनी विश्वास ठेवावा, तो येणारा म्हणजे येशू होय.”

प्रेषितांचीं कृत्यें 19:5 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
जेव्हा त्यांनी हे ऐकले, तेव्हा त्यांनी प्रभू येशूच्या नावात बाप्तिस्मा घेतला.

प्रेषितांचीं कृत्यें 19:6 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
आणि जेव्हा पौलाने त्याचे हात त्यांच्यावर ठेवले, तेव्हा पवित्र आत्मा त्यांच्यावर आला आणि ते निरनिराळ्या भाषा बोलू लागले व भविष्य सांगू लागले.

प्रेषितांचीं कृत्यें 19:7 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
या गटात सर्व मिळून बारा पुरूष होते.

प्रेषितांचीं कृत्यें 19:8 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
पौल यहूदी सभास्थानात जात असे व तीन महिने धैर्याने बोलत असे, देवाच्या राज्याविषयी चर्चा करीत व यहूदी लोकांचे मन वळवीत असे.

प्रेषितांचीं कृत्यें 19:9 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
परंतु त्यांच्यातील काही कठीण मनाचे झाले व त्यांनी विश्वास ठेवण्यास नकार दिला आणि ख्रिस्ताच्या मार्गाविषयी वाईट बोलले, मग पौल त्यांच्यातून निघून गेला व शिष्यांनाही त्यांच्यातून वेगळे केले आणि तुरन्नाच्या शाळेत दररोज त्यांच्याशी चर्चा केली.

प्रेषितांचीं कृत्यें 19:10 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
हे असे दोन वर्षे चालले, याचा परिणाम असा झाला की, आशियात राहत असलेल्या सर्व यहूदी व ग्रीक लोकांपर्यंत प्रभू येशूचे वचन पोहोचले.

प्रेषितांचीं कृत्यें 19:11 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
देवाने पौलाच्या हातून असामान्य चमत्कार घडविले.

प्रेषितांचीं कृत्यें 19:12 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
पौलाच्या शरीरावरून रुमाल आणि कपडेही आणून काही, लोक या गोष्टी आजारी लोकांवर ठेवत असत, जेव्हा ते असे करीत तेव्हा आजारी लोक बरे होत आणि दुष्ट आत्मे त्यांना सोडून जात.

प्रेषितांचीं कृत्यें 19:13 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
काही यहूदी सुद्धा सगळीकडे प्रवास करीत असत व लोकांमधून दुष्ट आत्मे घालवीत असत, ते दुष्ट आत्म्याने पछाडलेल्या व्यक्तीमधून प्रभू येशूच्या नावाने ते आत्मे घालवीत असत.

प्रेषितांचीं कृत्यें 19:14 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
ते म्हणत, “पौल ज्या येशूच्या नावाने घोषणा करतो त्या नावाने मी तुला आज्ञा करतो,” स्किवा नावाच्या यहूदी मुख्य याजकाचे सात पुत्र असे करीत होते.

प्रेषितांचीं कृत्यें 19:15 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
परंतु एकदा एक दुष्ट आत्मा त्यांना म्हणाला, “मी येशूला ओळखतो, पौल मला माहीत आहे, पण तुम्ही कोण आहात?”

प्रेषितांचीं कृत्यें 19:16 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
मग ज्याला दुष्ट आत्मा लागला होता त्या मनुष्याने त्यांच्यावर उडी मारली, त्याने त्यांच्यावर सरशी केली व त्यांना पराभूत केले, तेव्हा ते दोघे उघडे व जखमी होऊन घरातून पळाले.

प्रेषितांचीं कृत्यें 19:17 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
इफिस येथे राहणाऱ्या सर्व यहूदी व ग्रीक लोकांस हे समजले, तेव्हा सर्वांना भीती वाटली आणि लोक प्रभू येशूच्या नावाचा अधिकच आदर करू लागले.

प्रेषितांचीं कृत्यें 19:18 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
पुष्कळसे विश्वास ठेवणारे पापकबुली देऊ लागले व ज्या वाईट गोष्टी त्यांनी केल्या होत्या, त्या सांगू लागले.

प्रेषितांचीं कृत्यें 19:19 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
काही विश्वास ठेवणाऱ्यांनी जादूची कामे केली होती, या विश्वास ठेवणाऱ्यांनी आपली सर्व जादूची पुस्तके लोकांसमोर आणली आणि जाळली, त्या पुस्तकांची किंमत पन्नास हजार चांदीच्या नाण्यांइतकी भरली.

प्रेषितांचीं कृत्यें 19:20 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
अशा रीतीने प्रभूच्या वचनाचा दूरवर प्रसार झाला व ते फार परिणामकारक ठरले.

प्रेषितांचीं कृत्यें 19:21 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
या गोष्टी घडल्यानंतर पौलाला पवित्र आत्म्याने सुचवले की, मासेदोनिया व अखया या प्रांतांतून प्रवास करीत पुढे यरूशलेम शहरास जायचे आहे, तो म्हणाला, “मी तेथे गेल्यांनतर मला रोम शहरही पाहिलेच पाहिजे.”

प्रेषितांचीं कृत्यें 19:22 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
म्हणून त्याचे दोन मदतनीस तीमथ्य व एरास्त यांना त्याने मासेदोनियाला पाठवून दिले आणि त्याने आणखी काही काळ आशियात घालविला.

प्रेषितांचीं कृत्यें 19:23 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
याकाळामध्ये ‘त्या मार्गाविषयी’ मोठा गोंधळ उडाला.

प्रेषितांचीं कृत्यें 19:24 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
देमेत्रिय नावाचा एक मनुष्य होता, तो सोनार होता, तो अर्तमी देवीचे देव्हारे बनवीत असे, जे कारागीर होते त्यांना यामुळे खूप पैसे मिळत.

प्रेषितांचीं कृत्यें 19:25 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
त्या सर्वांना व या धंद्याशी संबंध असलेल्या सर्वांना त्याने एकत्र केले आणि तो म्हणाला, लोकहो, तुम्हास माहीत आहे की, या धंद्यापासून आपल्याला चांगला पैसा मिळतो.

प्रेषितांचीं कृत्यें 19:26 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
पण पाहा तो पौल नावाचा मनुष्य काय करीत आहे तो काय म्हणत आहे ते ऐका! पौलाने पुष्कळ लोकांस प्रभावित केले आहे व बदलले आहे, त्याने हे इफिसमध्ये व सगळ्या आशियामध्ये केले आहे, तो म्हणतो, मनुष्यांच्या हातून बनवलेले देव खरे देव नाहीत.

प्रेषितांचीं कृत्यें 19:27 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
ह्यामुळे या आपल्या धंद्याची बदनामी होण्याचा धोका आहे; इतकेच नव्हे तर ज्या महादेवी अर्तमीची पूजा सर्व आशिया प्रांत किंबहूना जगसुद्धा करते तिचे देऊळ निरुपयोगी ठरण्याचा व तिचे स्वतःचे महत्त्व नष्ट होण्याचा धोका आहे.

प्रेषितांचीं कृत्यें 19:28 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
जेव्हा त्यांनी हे ऐकले तेव्हा ते फार रागावले आणि मोठ्याने ओरडून म्हणू लागले, “इफिसकरांची अर्तमी थोर आहे.”

प्रेषितांचीं कृत्यें 19:29 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
शहरातील लोकांमध्ये गोंधळ उडाला आणि लोकांनी गायस व अरीस्तार्ख या पौलाबरोबर सोबती म्हणून प्रवास करणाऱ्या मासेदोनियाच्या रहिवाश्यांना पकडून नाट्यगृहात नेले.

प्रेषितांचीं कृत्यें 19:30 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
पौल लोकांच्या पुढे जाऊ इच्छीत होता पण येशूचे अनुयायी त्यास असे करू देईनात.

प्रेषितांचीं कृत्यें 19:31 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
पौलाचे काही मित्र जे प्रांताधिकारी होते, त्यांनी निरोप पाठवून त्याने नाट्यगृहात जाऊ नये अशी कळकळीची विनंती केली.

प्रेषितांचीं कृत्यें 19:32 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
एकत्र जमलेल्या जमावातून काही लोक एक घोषणा करू लागले तर दुसरे लोक इतर घोषणा करू लागले, त्यामुळे सगळा जमाव अगदी गोंधळून गेला आणि त्यातील पुष्कळ जणांना माहीत नव्हते की, आपण या न्याय भवनात एकत्र का आलोत.

प्रेषितांचीं कृत्यें 19:33 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
यहूदी लोकांनी आलेक्सांद्र नावाच्या एका मनुष्यास ढकलीत नेऊन सर्वांच्या समोर उभे केले, तो आपल्या हातांनी खुणावून त्यांना समजावण्याचा प्रयत्न करू लागला.

प्रेषितांचीं कृत्यें 19:34 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
पण जेव्हा लोकांस समजले की, तो एक यहूदी आहे, तेव्हा जवळ जवळ दोन तास सातत्याने ते एका आवाजात ओरडत राहिले, “इफिसकरांची अर्तमी देवी थोर आहे.”

प्रेषितांचीं कृत्यें 19:35 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
शहराचा लेखनिक लोकांस शांत करीत म्हणाला, “इफिसच्या लोकांनो, थोर अर्तमी देवीचे व स्वर्गातून पडलेल्या पवित्र दगडाचे इफिस हे रक्षणकर्ते आहे, हे ज्याला माहीत नाही असा एकतरी मनुष्य जगात आहे काय?

प्रेषितांचीं कृत्यें 19:36 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
ज्याअर्थी या गोष्टी नाकारता येत नाहीत त्याअर्थी तुम्ही शांत राहिलेच पाहिजे, उतावळेपणा करू नये.

प्रेषितांचीं कृत्यें 19:37 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
तुम्ही या दोघांना येथे घेऊन आलात, वस्तुतः त्यांनी मंदिरातील कशाचीही चोरी केली नाही किंवा आपल्या देवीची निंदा केलेली नाही.

प्रेषितांचीं कृत्यें 19:38 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
जर देमेत्रिय व त्याच्याबरोबर असलेल्या कारागिरांच्या काही तक्रारी असतील, तर त्यासाठी न्यायालये उघडी आहेत, तेथे ते एकमेकांवर आरोप करू शकतात.

प्रेषितांचीं कृत्यें 19:39 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
परंतु जर तुम्हास एखाद्या गोष्टीची चौकशी करायची असेल तर नियमित सभेत त्यासंबंधी विचार केला जाईल.

प्रेषितांचीं कृत्यें 19:40 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
आज येथे जे काही घडलेले आहे, त्याबद्दल योग्य ते कारण आपणांस सांगता येणार नाही, त्यामुळे आपणच ही दंगल सुरू केली असा आरोप आपल्यावर केला जाण्याची भीती आहे.”

प्रेषितांचीं कृत्यें 19:41 (MARIRV)
Square Portrait Landscape 4K UHD
असे सांगून झाल्यानंतर त्याने जमावाला जाण्यास सांगितले.

Available Bible Translations

American Standard Version (ASV)
Acts 19 (ASV) »
King James Version (KJV)
Acts 19 (KJV) »
GOD’S WORD® (GW)
Acts 19 (GW) »
Berean Bible (BSB)
Acts 19 (BSB) »
World English Bible (WEB)
Acts 19 (WEB) »
French Bible (LSG)
Actes 19 (LSG) »
Portuguese Bible (BSL)
Atos 19 (BSL) »
Spanish Bible (RVA)
Hechos 19 (RVA) »
Italian Bible (RIV)
Atti 19 (RIV) »
Chinese Simplified (CUVS)
使 徒 行 传 19 (CUVS) »
Chinese Traditional (CUVT)
使 徒 行 傳 19 (CUVT) »
Russian Bible (RUSV)
Деяния 19 (RUSV) »
Ukrainian Bible (UKR)
Дії 19 (UKR) »
Hungarian Bible (KAR)
Apostolok 19 (KAR) »
Bulgarian Bible (BULG)
Деяния 19 (BULG) »
Japanese Bible (JPN)
使徒行伝 19 (JPN) »

प्रेषितांचीं कृत्यें (MARIRV) Chapter Selection

MARIRV Book Selection List